डेल्टा प्लस रुग्ण आढळला : चंद्रपूर जिल्ह्यात डेल्टा प्लस रुग्ण आढल्याने खळबळ :लॉकडाऊन टाळण्यासा नागरिकांनी स्वतः काही बंधने पाळणे आवश्यक #delta-plus - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



डेल्टा प्लस रुग्ण आढळला : चंद्रपूर जिल्ह्यात डेल्टा प्लस रुग्ण आढल्याने खळबळ :लॉकडाऊन टाळण्यासा नागरिकांनी स्वतः काही बंधने पाळणे आवश्यक #delta-plus

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

सावली तालुक्यात एका तरुणाला कोरोनाच्या डेल्टा प्लस प्रकारच्या विषाणूची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. सदरचा व्यक्ती जुलै महिन्यात पॉझिटीव्ह आलेला होता. सध्या हा व्यक्ती कोरोनामुक्त झालेला आहे. परंतु खबरदारीचा उपाय म्हणून या व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींची चाचणी करण्यात आली असून त्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही.


लोकांनी घाबरून जाऊ नये. खबरदारी म्हणून तालुक्यातील नागरिकांनी सर्दी, ताप, खोकला इ सारखी लक्षणे असल्यास ग्रामीण रुग्णालय सावली या ठिकाणी कोविड ची RTPCR (आर टी पी सी आर) चाचणी करावी. निफंद्रा, निमगाव, अंतरगाव या गावांमध्ये सर्व्हे करण्यात येत असून नागरिकांनी सहकार्य करावे. नागरिकांचे आरोग्य सुरक्षित रहावे यासाठी सर्व्हे करण्यात येत आहे.

तालुक्यातील सर्व व्यापारी वर्गाने विशेष काळजी घेणे आवश्यक असून व्यवसायाच्या ठिकाणी कोविड विषयक नियमांचे पालन व्हावे यासाठी स्वतः प्रयत्न करावेत. लॉकडाऊन मुळे समाजाच्या सर्वच घटकांचे जीवन विस्कळीत होते. लॉकडाऊन टाळण्यासा नागरिकांनी स्वतः काही बंधने पाळणे आवश्यक आहे. कोरोना अजूनही हद्दपार झालेला नाही तरी नागरिकांनी मास्क वापरावा, सामाजिक अंतर राखावे व सॅनिटायझर चा वापर करावा.

तालुक्यामध्ये कोविड बाबत यापूर्वी अनेक उपाययोजना केल्या असून नागरिकांनी बऱ्याच अंशी सहकार्य केले असल्याने दुसऱ्या लाटेतून लवकर बाहेर पडता आले. तिसरी लाट रोखण्यासाठी सावली तालुक्यातील जनतेने आरोग्य विभाग व शासकीय यंत्रणेला सहकार्य करावे असे आवाहन तहसिलदार परिक्षीत पाटील यांनी केले.

Pages