आज दिनांक 29 जुलै मनपा चंद्रपूर साठी काळा दिवस म्हणायला हरकत नाही, आमसभेत विरोधकांचा गरदोळ, महापौरांचा सुटलेला संयम, आयुक्तांची नगरसेवकांच्या आक्रमकतेपुढचा केविलवानेपणा, त्यानंतर विरोधी नगरसेवकांचे निलंबन ते फौजदारीं तक्रारी च्या गोंधळात दिवसेंदिवस सामान्य जनतेचे प्रश्न संपूर्णतः मागे पडून काय ते राजकीय राडेच बघायला मिळत आहेत.
दिवसभर या घटनाक्रमानंतर शमते ना शमते आणखीन पुन्हा मनपा उपायुक्त विशाल वाघ यांनी महापौर पती नगरसेवक संजय कांचर्लावार यांचेवर अर्रवाच्च्य भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दिल्याने कलम 294,506,186 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात आज संपूर्ण दिवस राजकीय गरमा-गर्मीचे वातावरण बघायला मिळत आहे.
उपायुक्त विशाल वाघ यांच्या तक्रारीनुसार आमसभा स्थागित झाल्यानंतर आतरिक्त आयुक्त विपीन पालिवाल यांना दुपारी 2 च्या सुमारास महापौर यांनी त्यांच्या दालनात बोलाविले होते.त्यावेळी दालनात महापौर राखी कांचर्लावार, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, नगरसेवक देवाणंद वाढई, चंद्रकला सोयाम, कल्पना बगूळकर,आशा अबोजवार, छबूताई वैरागडे,मंगला आखरे, खुशबू चौधरी, संजय कांचर्लावार व इतर नगरसेवक उपस्थित होते.
महापौर यांच्या दालनात गेल्यानंतर आजच्या सभेच्या अनुषंगाने काही सूचना् त्यांनी आतरिक्त आयुक्त पालिवाल व उपायुक्त वाघ यांना केल्या. त्यानंतर लगेच काहीही कारण नसताना महापौर पती संजय काचर्लावार यांनी वाघ यांना आर्वच्छ व अश्लील भाषेत शिवीगाळ करत "तुम्ही बाहेरगावचे आहात,सांभाळून रहा-चारचोघे पाठवून कोणत्या वॉर्डात मारून फेकलं कळणार देखील नाही " अशी सर्वांसमक्ष धमकी दिल्याची तक्रार वाघ यांनी शहर पोलीस ठाण्यात नोंदविली.
शेवटी काय राडे करा, धक्के मारा, धमक्या वजा तक्रारी द्या पर्यंत मजली गेल्यावर जनतेच्या हिताचं फलित शहरात पावसाच्या पाण्याने साचलेल्या एखाद्या डबक्यात डुबवून स्वाहा... तूर्तास हेच.

