गोंधळी सभा : मनपाच्या आमसभेत अभूतपूर्व गोंधळ : विरोधी नगरसेवक नागरकर व स्थायी समिती सभापती आसवानी आमने सामने #mncchandrapur - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



गोंधळी सभा : मनपाच्या आमसभेत अभूतपूर्व गोंधळ : विरोधी नगरसेवक नागरकर व स्थायी समिती सभापती आसवानी आमने सामने #mncchandrapur

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

आमसभेत घुसून बॅनरबाजी करणारे काँग्रेस नगरसेवक आणि सत्ताधारी भाजप नगरसेवक एकमेकांसमोर उभे ठाकले. एवढेच नाही तर स्थायी समिती सभापती रवी आसवानी आणि नंदू नागरकर यांनी एकदुसऱ्यांवर हात उचलण्याचा प्रयत्न केला. या अभूतपूर्व गोंधळामुळे काही मिनिटे सभा तहकूब करण्यात आली. हा प्रकार आज 29 जुलै गुरुवारी चंद्रपूर शहर महानगर पालिकेच्या आमसभेत घडला.

कोविडच्या पार्श्वभूमीवर मनपाची आज ऑनलाइन आमसभा आयोजित केली होती. सभा सुरू झाल्यानंतर काही वेळात मनसेचे नगरसेवक सचिन भोयर अमृतच्या विषयावरून कार्यकर्त्यांसह सभागृहात प्रवेश करून निषेध नोंदवला. त्यानंतर काँग्रेसच्या नगरसेवकांनीही सभागृहात येऊन बॅनरबाजी केली.

या प्रकाराला सत्ताधारी नगरसेवकांनी विरोध केला. तेव्हा काँग्रेस आणि सत्ताधारी भाजप नगरसेवक समोरासमोर आले. शाब्दिक बाचाबाची सुरू असतानाच सभापती आसवानी आणि नागरकर यांनी एक दुसऱ्यांवर हात उचलण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराने सभागृहात चांगलाच गोंधळ उडाला. त्यानंतर महापौर यांनी काही मिनिटांसाठी सभा तहकूब केली.तर् आयुक्तांना चक्क हाथ जोडून नगरसेवकांना शांत राहण्याची विनवणी करावी लागली.

Pages