चंद्रपुरातील हल्दीरामवर अन्न, आौषधी प्रशासनाचा छापा मुदतबाह्य अन्नपदार्थ आढळल्याने दिली नोटीस #haldiram - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



चंद्रपुरातील हल्दीरामवर अन्न, आौषधी प्रशासनाचा छापा मुदतबाह्य अन्नपदार्थ आढळल्याने दिली नोटीस #haldiram

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

अन्न व औषध प्रशासनाने नागपूर मार्गावरील मे प्लॅनेट ओम इंडस्ट्रीज इंडिया प्रा. लि. (हल्दीराम) येथे छापा टाकला. यावेळी स्वीट चिली सॅास, पाणीपुरी, बारीक शेव, बेसन हे अन्नपदार्थ मुदबाह्य आढळून आले. त्यामुळे नोटीस बजावन्यात आली आहे.अन्न व आौषध प्रशासन विभागाने १२ जुलै रोजी मे प्लॅनेट फुड ओम इंडस्ट्रीज इंडिया प्रा. लि (हल्दीराम) या आस्थापनाची तपासणी करण्यात आली. या तपासणीत स्वीट चिली सॅास, पाणीपुरी, बारीक आग्रा शेव, बेसन आदी अन्नपदार्थ मुदतबाह्य असल्याचे आढळून आले. तपासणीदरम्यान आस्थापनात माशांचा वावर आढळून आला.


तेथे काम करीत असलेल्या कामगारांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली नाही. स्निग्ध पदार्थ व इतर पदार्थ कोणत्या माध्यमातून तयार केली जातात. याचा निर्देशफलकही नाही. स्टोअररुममध्ये खाद्य व अखाद्य पदार्थ एकत्र साठवलेले आढळले. तसेच विनापरवाना पेढीकडून अन्नपदार्थांची खरेदी केल्याचे आढळून आले. तसेच पेढीकडे अन्नपदार्थांची खरेदी बिले आढळली नाही.


या आस्थापनाने अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ नियम व नियमन २०११ च्या विविध तरतुदीचे उल्लंघन केले. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने हल्दीरामला नाोटीस बजावली आहे. नोटीसाच्या अनुशंगाने उत्तर मागविण्यात आले आहे. त्यानंतरच कारवाईची दिशा ठरविण्यात येईल. अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६, नियम व नियमने २०११ च्या अंतर्गत नियमांचे पालन करूनच अन्न व्यवसाय करावा. कोणत्याही प्रकारच्या अन्न पदार्थाची तक्रार असल्यास त्यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागाने केले आहे.

Pages