ब्रम्हपूरी तालुक्यातील ग्रामिण भागात अवैधरित्या दारूचा पुरवठा :- ब्रम्हपूरी शहरातील देशी दारू दुकानातून होत आहे विनापरवाना दारू पुरवठा.... :- पोलिस प्रशासनाने लक्ष देण्याची गरज.... :- दारू तस्कर ग्रामिण भागात सक्रिय. ##darubandi - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



ब्रम्हपूरी तालुक्यातील ग्रामिण भागात अवैधरित्या दारूचा पुरवठा :- ब्रम्हपूरी शहरातील देशी दारू दुकानातून होत आहे विनापरवाना दारू पुरवठा.... :- पोलिस प्रशासनाने लक्ष देण्याची गरज.... :- दारू तस्कर ग्रामिण भागात सक्रिय. ##darubandi

Share This
खबरकट्टा / ब्रम्हपूरी/प्रतिनिधी :-

एप्रिल 2015 रोजी चंद्रपूर जिल्हा दारूबंदी म्हणून घोषित करण्यात आली होती. त्यानंतर जिल्ह्यामध्ये अवैद्य दारूचे धंदे मोठ्या प्रमाणात सुरू होते. त्या काळामध्ये बरेच लोकांनी उदरनिर्वाहाचे साधन म्हणून दारू विक्री सुरू केली होती. दारूविक्री त्यावर मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल झाले होते. परंतु मदत व पुनर्वसन मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार यांनी चंन्द्रपुर जिल्ह्यांची दारू बंदी उठल्यानंतर आता दारू तस्करांनी आपलं जाळ ग्रामिण भागाकडे वळविला असुन ब्रम्हपूरी शहरातील देशी दारू दुकानातून अवैधरित्या विनापरवाना दारू साठा दिल्या जात आहे अशी खमंग चर्चा ग्रामीण भागात व शहरी भागात केली जात आहे.


ब्रह्मपुरी पोलिस स्टेशनला नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक यादव जाधव काही ठिकाणी अवैध दारू विक्रेत्यांचे मुसळे आवडले होते. परंतु चंद्रपूर जिल्हा दारू बंदी उठल्यानंतर पोलीस विभाग स्वस्थ बसले आहेत.


तर ग्रामीण भागातील दारू विक्रेते मात्र जोमात कामाला लागले आहेत. ब्रह्मपुरी शहरातील देशी दारू दुकानातुन देशी व विदेशी दारू ग्रामीण भागामध्ये दीवसा व रात्रीच्या सुमारास पोहोचली जाते. ब्रम्हपूरी शहरातील देशी दारू विक्रेत्या कडे पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.विनापरवाना एवढ्या मोठ्या प्रमाणावर दारू साठा पुरवठा केला जात असल्याने ग्रामिण भागात मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या दारू विक्री केली जात आहे.पोलिस प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले कि काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Pages