पेट्रोल-डिझेल-गॅस दरवाढ केंद्र सरकारने त्वरित मागे घ्यावी पंतप्रधान व पेट्रोलियम मंत्री यांना दिले निवेदन-विदर्भ राज्य आंदोलन समिती वणी (यवतमाळ) #wani - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



पेट्रोल-डिझेल-गॅस दरवाढ केंद्र सरकारने त्वरित मागे घ्यावी पंतप्रधान व पेट्रोलियम मंत्री यांना दिले निवेदन-विदर्भ राज्य आंदोलन समिती वणी (यवतमाळ) #wani

Share This
खबरकट्टा / यवतमाळ : 

विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने आज दिनांक 16 जूनला पेट्रोल-डिझेल-गॅस व इतर वस्तूंच्या प्रचंड जीव घेण्या दरवाढी विरोधात विदर्भात सर्व जिल्हा व तालुका स्तरावर विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतिने निवेदन देण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना उपविभागीय अधिकारी वणी यांचे मार्फत निवेदन पाठवून पेट्रोल-डिझेल-गॅस व इतर वस्तूंची प्रचंड झालेली वाढ त्वरित कमी करण्यासाठी आज निवेदन देण्यात आले.कोरोनाच्या महामारीमध्ये जनतेचे जगणे मुश्किल झाले आहे.रोजगार,व्यापार,शेती, व्यवहार सर्व ठप्प झाले आहे. अशा वेळीस ही सतत वाढ करून केंद्र सरकार जनतेची लूटमार करीत आहे.

आम्ही निवडून आलो तर पेट्रोल-डिझेल-गॅस सहित महागाई कमी करू असे आश्वासन भाजप सरकारने दिले होते. महागाईसाठी काँग्रेस वर टीका करणारे भाजप नेते मात्र केंद्रात भाजप सरकार बसल्यावर पेट्रोल-डिझेल-गॅसचे भाव दुपटीने वाढविले आहे.या भाववाढीचा विदर्भ राज्य आंदोलन समिती निषेध करते व त्वरित ही भाववाढ मागे घ्या असे केंद्र सरकारला मा. पंतप्रधान व धर्मेंद्र प्रधान पेट्रोलियम मंत्री यांना आवाहन केले.

यावेळी विदर्भ राज्य आंदोलन समिती जिल्हा प्रमुख प्रा.पुरुषोत्तम पाटील,यवतमाळ जिल्हा अध्यक्ष राहुल खारकर,यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष बाळकृष्ण राजूरकर,जिल्हा सचिव राजू पिंपळकर,जिल्हा सरचिटणीस मंगेश रासेकार,यवतमाळ जिल्हा सचिव ऍड सुरज महारतळे,वणी शहर अध्यक्ष संजय चिंचोलकर यासह विदर्भवादी उपस्थित होते.

Pages