बामणवाडा येथील स्मशानभूमीची दैनावस्था अग्निसदनिका,शोकसभा, नवीन बोरवेल,मोक्षधामकडे जाणाऱ्या रोड, व तलावाच्या खोलीकरणाची मागणी #rajura - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



बामणवाडा येथील स्मशानभूमीची दैनावस्था अग्निसदनिका,शोकसभा, नवीन बोरवेल,मोक्षधामकडे जाणाऱ्या रोड, व तलावाच्या खोलीकरणाची मागणी #rajura

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा - बामनवाडा -

राजुरा ला लागून असलेल्या बामणवाडा ग्राम पचायत येथील स्मशाभूमी दैनावस्था झालेली आहे .बामणवाडा येथील लोकसंख्या दिवशेन दिवस वाढीव ,नवीन वस्त्या वाढत असल्यामुडे लोकसंख्येत भर पडत आहे .सादर स्मशानभूमी वरील अंतीमसंस्कार सदनिका टिनाच्या शेडची असल्यामुडे ती जीर्ण झालेली आहे व व वादळ वाऱ्या मूळे सदनिकेवरचे टिनाचे पत्रे उडून गेले आहे व जे टिनाचे पत्रे आहे ते सुद्धा जीर्ण होऊन भोके पडलेले व फाटलेले आहे त्यामुळे पावसामध्ये एखाद्या मैयत व्यक्तीचा अंतीमसंस्कार करणे जिकिरीचे जात आहे.सादर स्मशन भूमी मधील बोरवेल कित्तेक दिवसापासून बंद आहे .मैयत व्यक्तीची शोक सभा घेण्यासाठी सदनिका नाही उन्हाळ्यात सावलीत उभे रहातो म्हटलं तर तिथे झाडे सुद्धा नाही.

म्हणून स्माशंभूमी मध्ये नवीन अग्निदहन सदनिका,शोकसभा सदनिका,पाण्यासाठी बोरवेल दुरुस्त वाल कंपाऊंड ,स्माशंभूमीकडे जाणाऱ्या रोड व तलावाचे सैदर्यीकरन इत्यादी विकास कामे करण्यासाठी 30 लाखाचा निधी विविध योजनेतून मिळण्यासाठी पालकमंत्री ना.श्री विजयभाऊ वडेट्टीवार मा.श्री खासदार बाळूभाऊ धानोरकर ,मा.श्री आमदार सुभाषभाऊ धोटे यांचे कडे विद्यमान ग्राम पंचायत सदस्य तथा माजी सरपंच सर्वानंद वाघमारे यांनी मागणी केली आहे.


सादर मोक्षधाम मध्ये सौंदर्यीकरण व वृक्ष लावण्याचे काम श्री सर्वानंद वाघमारे, व वृक्षप्रेमी श्री भास्कर करमानकर करीत आहेत.

Pages