राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक युवतीं विचारमंच, महाराष्ट्र राज्य च्या विद्यमाने जनसामान्य लोकांना कोरोना या आजाराची भीति दूर होण्यासाठी मुंबई येथील सुप्रसिद्ध मानसतज्ञ ईश्वरी मराठे यांचे कोरोना प्रादुर्भाव व मानसिक स्वास्थ्य या विषयावर दिनांक १६ जून २०२१ रोजी सायंकाळी ०५.वाजता ऑनलाइन मार्गदर्शन होणार आहे.
क्लिनिकल साइकोलॉजी मध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केल्यानंतर ईश्वरी मराठे यांनी अल्बर्ट एलीस इंस्टीट्यूट, न्यूयॉर्क (अमेरिका) येथून "तर्कसंगत, भावनात्मक आणि संज्ञानात्मक वर्तन तंत्र" (Rational Emotive Behavioral Therapy) चे विशेष प्रशिक्षण घेतलेले आहे. याशिवाय त्यांनी 'अहम' या मानसोपचार केंद्राची स्थापना केलेली आहे. सामजीक माध्यमांवर The Talking Therapist म्हणुन त्यांची विशेष ओळख आहे. कोरोना परिस्थिति व तिसर्या लाटेची पूर्वतयारी या पार्श्वभूमीवर मानसिक स्वास्थ जोपासण्याच्या मानसशास्त्रिय
दृष्टीकोन थेट जनतेशी सवांद साधुन त्या मांडणार आहेत. निवेदन सुमित लता प्रकाश उगेमुगे,प्रवक्ते वर्धा जिल्हा हे करणार आहेत.
कार्यक्रमाचे थेट लाइव प्रक्षेपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक युवतीं विचारमंच महाराष्ट्र राज्यच्या यूट्यूब चैनल व फेसबुक पेज वरुन होणार आहे,ह्या कार्यक्रमाचा जास्तीत-जास्त लोकांनी लाभ घ्यावा,असे आवाहन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक युवतीं विचारमंच महाराष्ट्र राज्य संस्थापक,अध्यक्ष अमर वानखड़े,मुख्य सचिव विकास बोरवार,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक युवतीं विचारमंच महाराष्ट्र राज्य अध्यक्षा साक्षिताई पवार, संघटक निलेश्वरीताई कळगुटकर,प्रवक्ते राज घुमनर, सुयोग राजनेकर, सोशलमीडिया प्रमुख प्रतीक लोखंडे यांनी केले आहे.
तसेच यवतमाळ जिल्ह्यातील समस्त जनतेंनी या कोरोना आजारात भीती घालविन्यासाठी घ्यावयाची उपाययोजना व ख़बरदारी करिता जास्तीत-जास्त लोकांनी अवश्य लाभ घ्यावा,असे आवाहन गणेश पुंडलिकराव ठमके यवतमाळ जिल्हा अध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष सागर दादा गोचे, जिल्हा सचिव सागर दादा नावाडे, व संघदीप दादा भगत रुपेश दादा ढोके पवन दादा मिलमिले गणपत दादा भट, जिल्हा प्रवक्त्या स्वाती ताई ठेंगणे, जिल्हा संघटक सुषमा सागर गोचे राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज युवक-युवती विचार मंच महाराष्ट्र राज्य यांनी केले आहे.
या संपूर्ण, कार्यक्रमाचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक युवतीं विचारमंच यवतमाळ जिल्हा च्या वतीने करण्यात आले आहे.
