चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय झाला. सहा वर्षांपूर्वी जिल्ह्यात दारूबंदीचा निर्णय घेण्यात आला होता. आता राज्य शासनेने अधिसूचना जारी केली. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या तीनही खंडपीठात कॅवेट दाखल करण्यात आले. आता उत्पादन शुल्क विभागाने ३१ मार्च २०१५ पर्यंत परवानगी असलेल्या दारूविक्री परवानाच्या नूतनीकरणाचे काम सुरु केले आहे. १६ जून २०२१ पासून चंद्रपूर, वरोरा आणि राजुरा येथे अर्ज स्वीकारले जाणार आहे. यासोबतच नवीन परवाना धारकांनाही अर्ज करता येणार आहे.
गृह विभागाने ८ जून २०२१ रोजी अधिसूचना काढून परवाने नुतणीकरणाचा आदेश दिला. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त कार्यालयाकडून आदेश जारी करण्यात आले. अर्ज स्वीकारण्यासाठी तीन विभागांची निश्चिती झाली. अर्ज प्राप्तीची प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीकडून अर्जाची छाणणी होईल. त्यानंतरच पुढील प्रक्रिया होणार आहे.-सागर डोहानकर, अधीक्षक, उत्पादन शुल्क विभाग, चंद्रपूर
