ऊन असो, वारा असो, कोरोना असो किंवा कोणाकडे रोना असो कर्तव्य दक्ष वणीतील खाकी आपल्या कर्तव्यावर नेहमीच सज्ज राहताना दिसते. चोरीच्या अनेक गुन्ह्यात हातावर तुरी देऊन पसार होणारा चोर सतीश उर्फ शेंबडया बाबाराव मडावी याच्या मुसक्या आवरण्यात वणी पोलिसांना दिनांक 20 ला यश आले आहे.
मागील काही दिवसात शहरासह वणी परिसरात दुचाकी चोरी, पान टपरी सह दोन मेडीकल मध्ये चोरी झाली होती. त्या चोरट्याच्या मागावर पोलीस होतेच, दरम्यान दि.२० मे रोजी गुरुवारी पोलीस स्टेशन वणी चे डी.बी पथक अधिकारी, कर्मचारी हे वणी शहर परिसरात आपत्ती विषयक गुन्हे उघडकीस येण्याचे दृष्टीने पेट्रोलींग करत असतांना मुखबीर कडुन प्राप्त माहिती नुसार चोरीचे गुन्हे करणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार सतिष उर्फ शेंबडया बाबाराव मडावी (२३) रा. दादाबादशाह नगर राळेगाव हा यात्रा मैदान वणी येथे उभा असुन त्याचे जवळ चोरीची एक डिवो मोपेड मोटार सायकल क्र.एमएच -२९ एए- ५३९६ ही असुन त्याने वणी शहरातील इतर चोरीचे गुन्हे केले आहे. अशी खबर मिळताच डि.बि.पथक यात्रा मैदान येथे पोहचले व सतिष मडावी यास ताब्यात घेवुन त्याचे कडुन पो.स्टे. वणी अप.क्र. ३२१/२०२१ कलम ३७९ भादंवि चोरीस गेलेली डिवो मोपेड मोसा.क्र. एमएच- २९ एए- ५३९६ मिळुन आली तसेच त्याचे जवळ नगदी सात हजार शंभर रुपये मिळुन आले.
त्यास सदर पैसे कोठुन आणले याबाबत विचारणा केली असता त्याने मागील काही दिवसापुर्वी वणी शहरातील पानठेला, दोन मेडीकल येथे रात्री दरम्यान केलेल्या चोरी मधील पैसे असल्याचे तसेच ग्राम मजरा येथुन मोटार सायकल चोरी केली होती असे कबुल केले.
सदर आरोपी कडुन वणी पोलीस स्टेशन येथील पाच चोरीचे गुन्हे उघडकीस आणुन त्याचे विरुद्ध कलम ३७९, ३८०,३७९, ४५७,३७९,४५७,३७८ असे अलग अलग प्रकरणातील पाच गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात आली आहे. सदरची कार्यवाही मा.संजय पुज्जलवार उपविपोअ वणी यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक वैभव जाधव, पोउपनि गोपाल जाधव, पोहवा सुदर्शन वानोळे, विट्ठल बुर्रेवार, सुनिल खंडागळे, सुधीर पांडे, रत्नपाल मोहाडे, पंकज उंबरकर, दिपक वांड्रसवार यांनी केली.
