ब्रम्हपुरी शहराला पोलीस प्रशासनाने शांत, सभ्य शहर म्हणून विदर्भात ओळख निर्माण करून दिली.ब्रम्हपुरी तालुका मोठा असल्याने येथील शांती व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक शहरात कर्तव्यदक्ष अधिकार्यांची नेमणूक करतात. मात्र काही वर्षांपासून ब्रम्हपुरी शहर अवैध व्यवसायाने वादग्रस्त ठरत असून अवैध व्यवसायिकांचा केंद्र बिंदू ठरत आहे, त्यात भरीस भर जणभावनेनुसार सतत वादग्रस्त ठरत अवैध व्यवसायिकांना थोपवण्यात अयशस्वी ठरलेले पोलीस निरीक्षक मल्लिकार्जुन इंगळे यांची तडकाफडकी चंद्रपूर येथे बदली करण्यात आली.
जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी ब्रम्हपुरी येथे कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल कुंभरे यांना ब्रम्हपुरी पोलिस स्टेशनचा तात्पुरत्या स्वरूपात प्रभारी ठाणेदार म्हणून कामकाज सोपविण्यात आले.
तस्करी करणारे वाळू तस्कर, अवैध दारू तस्करी करणारे दारुमाफिया सट्टा मटका , पोलीस प्रशासनात असलेल्या दुफळी ने होणारा डी बी पथक भंग प्रकरण तर कुठल्याही शासकीय व बिनशासकीय कामात राजकीय प्रभावाने "कमिशनखोरी" करणारा राजकीय नेता इत्यादी सर्व गैरप्रकार जनतेसमोर आणले.काही काळापुरते ब्रम्हपुरी पोलीस स्टेशन ला ठाणेदार पदावर रुजू असलेल्या ठाणेदार इंगळे यांच्या कार्यप्रणाली मध्ये शहरात अवैध कारभाऱ्यांची चंदी बघायला मिळाली तर कायदा सुव्यवस्थेवर जनतेतून प्रश्न चिन्ह उपस्थित केल्या गेले नवे प्रभारी ठाणेदार म्हणून रुजू झालेल्या श्री अनिल कुमरे यांच्या कडून शहराची मलीन झालेली प्रतिमा अबाधित राखण्याचे मोठे आव्हान उभे आहे.
