खबरकट्टा / यवतमाळ : वणी :- सुरज चाटे
वणीतील रंगारीपुर वार्ड, येथील उल्हास कृष्णराव बांगडे यांच्या घरी दिनांक 24 फ्रेब्रुवारी 2020 ला दुपारी गॅस सिलेंडर स्फोट झाला होता. त्यात घरघुती वापरातील वस्तू जळल्याने मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर रवी सेल्स एजन्सी च्या वतीने नुकसान भरपाई मिळण्याकरिता प्रयत्न केले आणि आज एच.पी.गॅस कंपनी च्या वतीने दोन लाख रुपयांच्या नुकसान भरपाई चा धनादेश बांगडे कुटूंबियांना देण्यात आला.
बांगडे यांच्या घरीरातील गॅस सिलेंडर गळती मुळे स्फोट झाला. व यात गॅस,फ्रीज,कपाट, केंट(आर.ओ),मॉड्युलर किचन,मिक्सर, LED टीव्ही(42 in),कुलर इत्यादी घरगुती वापरातील वस्तू जाळून नुकसान झाले होते.मात्र एक चांगली गोष्ट की कुठलीही जीवित हानी झाली नव्हती.झालेल्या नुकसानावर बांगडे कुटूंबियांया च्या वतीने रवी सेल्स एजन्सी येते तक्रार करण्यात आली असता.एजन्सीच्या वतीने एच.पी.गॅस कंपनी ला घटनेची माहिती दिली असता.
कंपनीच्या वरीष्ठ विक्री अधिकारी विशाल सूर्यवंशी द्वार पाहणी व पंचनामा करण्यात आले होते.मात्र रवी सेल्स एजन्सी चे संचालक रवींद्र निखार यांनी सातत्याने प्रयत्न करीत तब्बल 14 महिन्यानंतर बांगडे कुटूंबियांना अखेर दोन लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळवून दिली.व दोन लाख रुपयांचा धनादेश बांगडे कुटूंबियांना सुपूर्द करण्यात आले.


