'मदतीचा एक घास' बनेल पोटाचा आधार महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसचा स्तुत्य उपक्रम जिल्ह्यात आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केली सुरवात #pratibha-dhanorkar - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



'मदतीचा एक घास' बनेल पोटाचा आधार महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसचा स्तुत्य उपक्रम जिल्ह्यात आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केली सुरवात #pratibha-dhanorkar

Share This




खबरकट्टा / चंद्रपूर :

कोरोनामुळे संपुर्ण देशात आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी देशातील अनेक भागांमध्ये लॉकडाऊन लावण्यात आला आहे. या लॉकडाऊनने लोकांच्या पोटाला देखील लॉक लागला आहे. लोकांच्या हाताचे काम गेल्याने अनेक लोक अर्धपोटी, तर काही लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनाच्या काळात आरोग्य व्यवस्थेबरोबरच भूकेचा मोठा प्रश्न निर्माण झालेला असताना विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष मदत करताना दिसत आहेत.


त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कडून नवीन उपक्रम राबवण्यात आला आहे. महिला व बालविकास मंत्री मा.श्रीमती यशोमती ठाकूर , महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष श्रीमती संध्याताई सव्वालाखे, मा. आमदार प्रणिती ताई शिंदे यांच्या नेतृत्वात या उपक्रमाची सुरवात झाली. आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी स्वतः स्वयंपाक करून गरजू लोकांना डब्बे दिले. कॉग्रेसच्या सर्व महिलांनी पुढे येऊन उपकरणात सहभागी होण्याच्या आवाहन आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केले आहे.


एक आई, एक बहीण, एक गृहिणी ,आणि अन्नपूर्णा चा वसा कांग्रेस च्या महिला आणि नेत्या पूर्ण करु शकतात हे आज त्यांनी दाखवून दिले, आज आपल्या महिला नेत्यांनी स्वयंपाक घरात घुसल्या आहेत जनते च्या मदतीसाठी तर कार्यकर्त्यां पण कंबर कसून कामाला लागतील, " मदतीचा एक घास " महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कडून राबवण्यात येणाऱ्या हया उपक्रमा द्वारे आता गरजू लोकांना मिळणार आहे. घरचे जेवण, आपण घरात ज्या पोळ्या करतो त्यात रोज 10 पोळ्या जास्त करायच्या आणि पाव भर भाजी जास्त करायची , आशा 40 ते 50 पदाधिकारी महिलांनी पोळ्या आणि भाजी जमा केल्या तर रोजच्या 400 ते 500 पोळ्या होतील हया आम्ही एखाद्या संस्थे ला किंवा महिला आघाडी च्या बैनर खाली लोकांना देणार आहोत,आणि तशी आमदार प्रतिभाताई यांनी सुरवात केली आहे. 


🤝 काय आहे 'मदतीचा एक घास' उपक्रम?
थेंबे थेंबे तळे साचे, घरच्या गृहिणी घरी रोज स्वयंपाक करत असतात, त्याच स्वयंपाकातील प्रत्येक महिला काँग्रेस कार्यकर्त्याने दहा ते बारा चपात्या अधिक करून हा डब्बा गरजू लोकांना पोचवावे, हा उद्देश या उपक्रमाचा असून त्या साठी एक केंद्र तयार करून सर्व जमलेले डब्बे गरजू लोकांपर्यंत पोहचवले जाणार आहेत.

Pages