ब्रेकिंग न्यूज :- भर दिवसा वरोरा येथील गांधी चौकात सूकराम या युवकाचा खून #murder - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



ब्रेकिंग न्यूज :- भर दिवसा वरोरा येथील गांधी चौकात सूकराम या युवकाचा खून #murder

Share This
निलेश ढोके या 19 वर्षीय माथेफिरू युवकाने केला चाकूने हल्ला. पोलीसांनी केली तात्काळ अटक.


खबरकट्टा / वरोरा ब्रेकिंग : 

वरोरा शहरात व तालुक्यात अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू असून आपसी स्पर्धेतून व कट काटशह यातून एकमेकांवर खुनी हल्ले होत आहे यातच आज दिनांक 13 मे ला दुपारनंतर 4 वाजता च्या दरम्यान शहराच्या गांधी चौकात निलेश ढोके या 19 वर्षीय माथेफिरू युवकाने सूकराम आलम या 26 वर्षीय युवकाचा चाकूने गळ्यावर वार करून खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

सूकराम वसंत आलम राहणार अंबादेवी वार्ड असे मृतकाचें नाव असून तो पाहुणा येथील रहिवाशी आहे. त्याचे निलेश ढोकेया 19 वर्षीय युवकाशी भांडण झाले असता निलेशने खिशातील चाकू काढून सूकराम च्या सरळ गळ्यावर वार करून जागीच ठार केले.

पोलिसांना माहीती मिळताच ते घटनास्थळी पोहचले व आरोपी निलेश ला ताब्यात घेतले आहे. सूकराम चे नुकतेच काही वर्षापूर्वी लग्न झाले असल्याचे बोलल्या जात आहे. या भरदिवसा झालेल्या खुनामुळे शहरातील वातावरण तापले असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे संकेत मिळत आहे.

Pages