पंचांग अनुसार १४ मे २०२१ ला वैशाख मासच्या शुक्ल पक्षला अक्षय तृतीया आहे. अक्षय तृतीयाला खानदेशात याला अंगारीचा सण देखील म्हणतात. या दिवशी घागराची पूजा केली जाते, त्याला कुंकू, हळद, वाहून पूजा केली जाते आणि त्या मटक्यात साचवलेले पाणी पुढे वर्षभर पाणी प्यायले जाते, हे सर्व आपल्याला माहिती आहे, पण तुम्हाला माहिती आहे का या दिवशी पशुराम यांची पण जयंती असते. परशुराम यांचा जन्म झाला होता. परशुराम यांच वर्णन रामायण, महाभारत, भागवत पुराण आणि कल्कि पुराणात आहे. असं म्हटलं जातं की, भारतातील अनेक गावे ही परशुराम यांनी बसवली आहेत.
वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या तृतीय तिथीला अक्षय्य तृतीया म्हटले जाते. या दिवशी जी व्यक्ती विधीवत दानपुण्य करते ती व्यक्ती सर्व प्रकारच्या पापातून मुक्त होते. ती व्यक्ती देवाची अतिशय आवडती व्यक्ती असते. देव तिच्या नशिबाची दारे उघडतो. देवाला काही गोष्टी प्रिय असतात. ज्यांचे दान केल्याने त्या व्यक्तीस सौभाग्य मिळते.
हिंदू धर्मात तप, व्रत, दान आणि तीर्थ याला विशेष महत्त्व आहे. जी व्यक्ती विधीवत व्रत ठेवून तप आणि दान-पुण्य करते त्या व्यक्तीस अक्षय़ पुण्य फलाची प्राप्ती होते. वैशाख महिन्यात या धार्मिक कार्यांना मोठे महत्त्व आहे.. तर या महिन्यात येणाऱ्या अक्षय तृतीयेच्या(akshay tritiya) दिवशी केले जाणारे दान हे नेहमी अक्षय्य राहते. सध्या हा महिना वैशाख महिना आहे आणि १४ मेला अक्षय तृतीया आहे.(Do daan of this thngs in akshay tritiya)

अक्षय तृतीयेला या गोष्टींचे करा दान, उजळेल तुमचे नशीब
वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या तृतीय तिथीला अक्षय्य तृतीया म्हटले जाते. या दिवशी जी व्यक्ती विधीवत दानपुण्य करते ती व्यक्ती सर्व प्रकारच्या पापातून मुक्त होते. ती व्यक्ती देवाची अतिशय आवडती व्यक्ती असते. देव तिच्या नशिबाची दारे उघडतो. देवाला काही गोष्टी प्रिय असतात. ज्यांचे दान केल्याने त्या व्यक्तीस सौभाग्य मिळते.
💎 अक्षय तृतीयेच्या दिवशी या वस्तूंचे करा दान
जल पात्राचे दान - हिंदू धर्मातील ग्रंथानुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी जल पात्र म्हणजेच ग्लास, घडा यांचेदान केले पाहिजे. या वस्तूंचे दान करणे शुभ असते.
गायीची सेवा करा - अक्षय तृतीयेच्या दिवशी गाईची सेवा केल्याने अक्षय्य पुण्याची प्राप्ती होते. यादिवशी गुळाचे दान केले पाहिजे. गायीला गूळ पाण्यात मिसळून ते प्यायला द्या. अथवा या दिवशी पिठात गूळ घालून अथवा पोळीमध्ये गूळ घालून गायीला खायला दिले पाहिजे. यामुळे पुण्य मिळते.
जव दान करणे - या दिवशी भगवान विष्णूची पुजा केली जाते. त्यांच्या चरणी जव हे धान्य अर्पण केले जाते. त्यानंतर भगवान विष्णूची पुजा करून हे जव लाल कपड्यांत बांधून कपाटात ठेवले जातात. असे केल्याने तुमच्या कपाटाची तिजोरी कधीच रिकामी होणार नाही.
अन्न दान - हिंदू धर्मात अन्नदान सर्वात मोठे दान मानले जाते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी केले जाणारे अन्नदान हे पुण्यप्राप्ती करून देते. या दिवशी केलेले पुण्य कधीच संपत नाही. त्यामुळे या दिवशी गरजू लोकांना अन्नदान केले पाहिजे.
Daily Horoscope राशी भविष्य, १४ मे २०२१ : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या १२ राशींसाठी कसा असेल दिवस? जाणून घ्या या राशींचे डेली भविष्य...
♈️मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today: एखाद्या कामाचे पैसे बऱ्याच दिवसांनंतर आता मिळण्याची शक्यता आहे. मित्रांच्या भेटीगाठी होतील. कामात प्रगती होईल. आरोग्याची समस्या जाणवू शकते. शुभ रंग - पांढरा.
♉️वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today: कामात चांगली प्रगती कराल. विद्यार्थ्यांना चांगले यश प्राप्त होईल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. जोडीदाराची चांगली साथ मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. शुभ रंग- हिरवा.
♊️मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope Today: व्यवसायात एखाद्या व्यक्तीला पैसे देताना सावधानता बाळगा. प्रलंबित काम पूर्ण होईल, धनलाभ होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक आयुष्य आनंदी असेल. आरोग्य चांगले असेल. शुभ रंग - निळा.
♋️कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope Today: दिवस तुमच्यासाठी संघर्षाचा असेल. लेखन आणि सिनेक्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींसाठी दिवस चांगला जाईल. वायफळ खर्च टाळण्याचा प्रयत्न करा. शुभ रंग - पिवळा
♌️सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today: विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात चांगले यश प्राप्त होईल. मीडिया, आयटी आणि बँकिंग क्षेत्रातील व्यक्ती आपलं काम वेळेआधी पूर्ण करतील. आरोग्याची काळजी घ्या. शुभ रंग - पांढरा.
♍️कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today: एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात नव्या संधी उपलब्ध होतील. विद्यार्थी चांगली प्रगती करतील. प्रेमी जोडप्यात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. शुभ रंग - हिरवा.
♎️तूळ राशी भविष्य / Libra Horoscope Today: व्यवसायात चांगलं यश प्राप्त होईल. बँकिंग क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना चांगले यश मिळेल. शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना चांगली बातमी मिळेल. कौटुंबिक आयुष्य आनंदमय असेल. आनंदाची बातमी मिळेल. शुभ रंग - निळा.
♏️वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today: विद्यार्थ्यांना चांगलं यश प्राप्त होईल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना वरिष्ठांचे आशीर्वाद मिळतील. बाहेरील खाद्य-पदार्थ खाणं टाळा. शुभ रंग - पिवळा.
♐️धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today: गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेलं काम पूर्ण होईल. आयटी तसेच मीडिया क्षेत्रातील व्यक्तींना अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. शुभ रंग - केशरी.
♑️मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today: विद्यार्थ्यांना एखादा निर्णय घेण्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. ऑफिसमधील कामं बऱ्याच मेहनतीनंतर पूर्ण होतील. वाद विवाद टाळा. शुभ रंग - निळा.
♒️कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today: राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींसाठी दिवस खूपच चांगला असेल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसायात चांगला नफा होण्याची शक्यता आहे. शुभ रंग - निळा.



