महिला या संवेदनशील असतात, त्यांना परिस्थिती अधिक चांगली समजून घेता येते. त्यांना सर्वांच्या पोटाची चिंता असते. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेऊन, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस च्या वतीने 'एक हात मदतीचा' हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात येणार आहे.
आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी च्या कार्याध्यक्ष आणि राज्य महिला काँग्रेस च्या प्रभारी प्रणिती शिंदे, व प्रदेश महिला काँग्रेस च्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे यांच्या हस्ते या उपक्रमाचा ऑनलाईन पद्धतीने शुभारंभ करण्यात आला.
घरच्या गृहिणी घरी रोज स्वयंपाक करत असतात, त्याच स्वयंपकात प्रत्येक महिला काँग्रेस कार्यकर्त्याने दहा ते बारा चपात्या अधिक करून हा डब्बा गरजू लोकांना पोचवावे, हा उद्देश या उपक्रमाचा असून त्या साठी एक केंद्र तयार करून सर्व जमलेले डब्बे गरजू लोकांपर्यंत पोहचवले जाणार आहेत.' गरजू लोकांना मिळणार घरचे जेवण अशी माहिती नम्रता ठेमस्कर महिलाकाँग्रेस प्रदेश सचिव यांनी टीम खबरकट्टा ला दिली.
या माध्यमातून गरजू लोकांना पोटभर जेवन मिळेल आणि राजकारणाच्या माध्यमातून जनसेवा घडून येईल' असे आवाहन आमदार प्रणिती शिंदे यांनी या वेळी आयोजित झूम मिटींग मध्ये केले.
या मिटिंग मध्ये महिलांच्या अनेक प्रश्नवर चर्चा करण्यात आली.या वेळी प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे यांनी 'शिवभोजन थाळी केंद्र महिलांना मिळावे, सर्व समितींमध्ये महिलांना स्थान मिळावे, त्या सबोतच महिलांना स्वयंरोजगार मिळाले पाहिजे, महिलांसाठी स्वतंत्र लसीकरण केंद्र उभारावे आशा मागण्या सरकारकडे करणार असल्याची माहिती सर्व महिलांना दिली. या मीटींगला सर्व प्रदेश पदाधिकारी सहित आणि जिल्हाध्यक्ष,शहर अध्यक्ष उपस्थित होत्या.


