भद्रावती तालुक्यातील मौजा चंदनखेडा येथे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळे मध्ये कोविड विलगिकरन कक्षाचे उदघाटन आज मा. आमदार प्रतिभाताई बाळूभाऊ धानोरकर यांच्या हस्ते पार पडले.
चंद्रपूर जिल्हा मध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे त्यामुळे अनेक जणांनाचे आपले जीव गमवावे लागले याचीच दखल घेत मा. आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या प्रयत्नातून आणि ग्रामपंचायत चंदनखेडा च्या सहकार्य जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळे मध्ये कोविळ विलीगिकरन कक्ष सुरू करण्यात आले या कोविळ विलीगिकरन कक्षाचे मा. प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
या मुळे ग्रामीण भागातील कोविळ रूग्णांना वेळेवर उपचार घेणे शक्य झाले आहे या वेळी ग्राम पंचायत चंदनखेडा चे सरपंच नयन बाबाराव जांभूळे तसेच ग्रामपंचायत चे सर्व सदस्य गण, जिल्हा परिषद सदस्य मा. मारोतिभाऊ गायकवाड, तहसीलदार मा. महेश सितोडे गट विकास अधिकारी डॉ. मंगेश आरेवार , तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.आसुटकर नायब तहसीलदार मा. भांदकर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. झाडे तलाठी गीता आलम माजी सरपंच सुमितजी मुडेवार सामाजिक कार्यकर्ते श्री सुधिरभाऊ मुडेवार व इतर आधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


