चार दिवसांपासून अनेक मशनरीद्वारे नदी खोदकामाचा सपाटा अंधारी नदीपात्रात रेतीचे ढिगारेच ढिगारे काठावरील बांधकाम साइटवरही मोठा रेतीसाठा #sand-trafficking - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



चार दिवसांपासून अनेक मशनरीद्वारे नदी खोदकामाचा सपाटा अंधारी नदीपात्रात रेतीचे ढिगारेच ढिगारे काठावरील बांधकाम साइटवरही मोठा रेतीसाठा #sand-trafficking

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : पोंभुर्णा प्रतिनिधि - 

पोंभुर्णा तालुक्यासह गडचिरोली जिल्ह्याला जोडणा-या सिमेवरून अंधारी नदी वाहते.या नदीवर फार मोठ्या पुलाची निर्मिती होत आहे.सदर कामासाठी दोन ते तीन यांत्रिक मशीनद्वारे चक्क नदीपात्रालाच उपसण्याचा कारनामा सुरू आहे.दिवसाढवळ्याच उत्खनन करीत आहेत.दुसरीकडे काठावरील पुलाच्या बांधकाम साइटवर आतापर्यंत शेकडो ब्रास रेती टाकल्या गेली आहे.याची चर्चा गावभर रंगू लागताच आजही मोठ्या प्रमाणात रेतीचे ढिगारे उत्खनन करून नदीपात्रात आढळून आले आहेत.


दरम्यान या रेतीसाठ्याची कुठल्याहीक्षणी बेकायदा वाहतूक होण्याची शक्यता वर्तविली जात असतानाच पुल व रोडच्या बांधकामाकरिता कंत्राटदारानेच नदीपात्रातून रेती चोरल्याच्या प्रकाराची चर्चा परिसरात सुरू आहे.


पोंभुर्णा व गोंडपिपरी तालुक्याला जोडणारा राज्यमार्ग तालुक्यातील तारडा गावापासून जात आहे.या रस्त्याचे काम संथगतीने चालले.तारडा गावालगत अंधारी नदी वाहत असून या नदीवर मोठया पुलाचे बांधकाम चंद्रपुरातील एका ठेकेदारांमार्फत सुरू आहे.या पुलाच्या बांधकामासाठी हजारो ब्रास रेतीची आवश्यकता राहणार असल्याचे बोलल्या जात असून ही गरज पूर्ण करण्यासाठी सदर ठेकेदाराने चक्क अंधाऱ्या नदीवरच कब्जा चढविल्याची चर्चा पंचक्रोशीत सुरू आहे.


याच ठेकेदाराने नदीकाठावर आपला डेरा मांडला असून दिवसाढवळ्या एक-दोन नव्हे तर चक्क तीन यांत्रिक मशीनच्या माध्यमातून नदीपात्राला उपसण्याचा पराक्रम त्याने चालविल्याचे बोलल्या जात आहे.हा प्रकार मागील चार दिवसांपासून चालला असतांना अजूनपर्यंत याची काही एक कल्पना तालुका प्रशासनाला नसेल तर नवलच.यांत्रिक मशीनच्या माध्यमातून जवळपास अर्धे पात्र आताच खोदून काढले आहे.पुन्हा याच नदीपात्रातून रेती उत्खनन जोमात सुरू असून पात्रात मोठमोठी खड्डे पडली आहेत.दरम्यान अंधाऱ्या नदीकाठावरील बांधकाम साईटवर देखील रेतीचा मोठ्या प्रमाणात साठा दिसून आला.

मशिन्सद्वारे उत्खनन होत असल्याचा विडिओ :

पुलाच्या साइटवर एन टाळेबंदीच्या काळात अचानक आढळून आलेल्या रेतीच्या मोठ्या साठ्यामुळे चांगलीच खळबळ उडाली.या कारनाम्याची जोरदार चर्चा परिसरात रंगू लागली असताना सदर रेतीचा बांधकामासाठी वापर करणार नसल्याचे सांगून केवळ सुरक्षेसाठीच नदीपात्रातील माल इतरत्र हलविल्याची माहिती जाणीवपूर्वक गावातील कुठल्यातरी एका गोटामार्फत आता पसरविली जात आहे.हा सर्व बचाव असून आपली चूक व केलेली चोरी लपविण्यासाठी केलेला प्रयत्न आहे.


अशावेळी राज्यमार्गावरील तारडा पुलाचे बांधकाम लवकरच सुरू होईल तोपर्यंत या बांधकाम साइटवर मोठ्या प्रमाणात रेतीसाठा आला कुठून आणि अंधारी नदीपात्रातून रेती उत्खनन करणाऱ्याचा शोध घेण्यासह त्याच्यावर जबाबदारी निश्चित करून कायदेशीर कार्यवाही होण्याची गरज आहे.दरम्यान या महत्त्वपूर्ण प्रकरणात गोंडपिपरी तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी डोळ्याला पट्टी बांधून राहतील की आपल्यातल्या कर्तव्य आणि जबाबदारीची जाणीव ठेवून ते या बोगस प्रकारावर कार्यवाही करतानाच मोठ्या 'मासोळ्या'लाही कायद्याच्या कचाट्यात ओढतील,हा प्रश्नच आहे.

Pages