रुग्णवाहिकांचे भाडेदर जाहीर जादा दर आकारल्यास गुन्हा नोंदविणार - उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे #ambulance - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



रुग्णवाहिकांचे भाडेदर जाहीर जादा दर आकारल्यास गुन्हा नोंदविणार - उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे #ambulance

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर, दि. 28 एप्रिल :


रुग्णवाहिकांचे भाडे दर निश्चित करण्याबाबत उच्च न्यायालयाच्या सुचनांच्या अनुषंगाने व परिवहन आयुक्त कार्यालयाच्या निर्देशाप्रमाणे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांचे अध्यक्षतेखाली बैठक घेऊन रुग्णवाहिकांचे भाडे दर निश्चित केले आहेत. यानुसार पहिले 25 किलोमीटर अंतर अथवा 2 तास यासाठी मारूती व्हॅन करिता 800 रुपये व त्यापुढील प्रत्येक किलोमीटर साठी 15 रुपये, टाटा सुमो व मॅटॅडोर सदृष्य वाहनाकरिता पहिल्या 25 किलोमीटरसाठी 900 रुपये व त्यापुढील प्रत्येक किलोमीटर साठी 15 रुपये, टाटा 407, स्वराज माझदा इ. साठी रु. 1200 व रु. 18 प्रती कि.मी., आय.सी.यू. अथवा वातानुकूलित वाहनाकरिता रु. 2000 व रु.25 प्रती कि.मी. याप्रमाणे रुग्णवाहिकेचे दर ठरविण्यात आले आहेत.


जे वाहन चालक व मालक विहीत भाडे दरापेक्षा जास्त भाडे आकारणी करतील, त्यांचेवर पहिल्या गुन्ह्यासाठी रुपये पाच हजार, दुसऱ्या गुन्ह्यासाठी रुपये दहा हजार व तिसऱ्या गुन्ह्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद घेण्यात येईल.


नागरिकांनीही उपरोक्त ठरविलेल्या दरापेक्षा अधिक भाडे देऊ नये व याबाबत काही तक्रारी असल्यास उप प्रादेशिक परिवहन कार्यालयास लेखी स्वरूपात किंवा mh३४@mahatranscom.in या ई-मेल पत्त्यावर तक्रार सादर करण्यात यावी, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी कळविले आहे.

Pages