अंगावरची हळद उतरली नाही आणि काळाने तिचा घात केला.. अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी..! #covid-19 - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



अंगावरची हळद उतरली नाही आणि काळाने तिचा घात केला.. अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी..! #covid-19

Share This

खबरकट्टा / चंद्रपूर ::गोंडपिपरी :

शहरातील इंदिरानगर भागातिल रहिवाशी मोरेश्वर मशाखेत्री यांचा लहान मुलगा शंकर याचे वीस दिवसा अगोदर गडचिरोली जिल्ह्यातील पारडी या गावातील राणी नावाच्या मुलीशी दिनांक ८/४/२०२१रोजी विवाह झाला.


विवाहाच्या रेशीम बंधनात अडकून त्यांनी संसाराचा गोडवा अनुभवायला सुरूवात केली.लग्न होऊन वीस दिवस लोटले नाही,अश्यात त्या नवविवाहित जोडप्यांना कुणाची तरी नजर लागली.लग्नाच्या काही दिवसातच शंकरच्या पत्नीच्या प्रकृतीत बिघाड झाला.त्याने तिला बऱ्याच डॉक्टरांकडे दाखवले तरी प्रकृतीत सुधारणा होत नव्हती शेवटी आई वडिलांच्या भेटीने तरी तिला बरे वाटेल या हेतूने तिला तिच्या माहेरी आणला  डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार औषोधोपचार सुरूच होता,पण काळ कुणावर कसा, कधी आणि कुठे झेप घेणार सांगत येत नाही.अश्यात राणीच्या प्रकृतीत अस्वस्थता जाणवायला लागली आणि अकस्मात तिने शंकरचा हात सोडला तो पण कायमचा.


अंगावरची हळद उतरली नाही, संसाराचा गाडा ओढण्याच्या शर्यतीत, कोरोणाच्या प्रतिकूल परिस्थितीत आज बुधवार ला दुपारी तिने अखेरचा श्‍वास घेतला.तिच्या अश्या अकस्मात जाण्याने शंकर वर दुःखचा डोंगर कोसळला असून दोन्ही परिवार शोकाकुल परिस्थितीत आहेत.शंकरच्या पत्नीच्या मृत्यूची बातमी गावात पसरताच त्यावर कुणालाच विश्वास बसत नव्हता.

Pages