नागपूर वरून ताडोबा अभयारण्यातील कोलारा जवळील देवरी येथील वन्य विलास या रिसॉर्ट मध्ये ऑनलाईन बुकिंग करून ताडोबा जंगल सफारी करीता जात एस वळणावर अपघात झाल्याने दोघांचा मृत्यू झाला.
आज दिनांक.०१/१२/२०२० ला सकाळी ११ वाजून १५ मिनिटांनी चिमूर जवळील बांबू रिसॉर्ट पासून ५०० मिटर अंतरावरील तुकुम चा भडगा नाला मध्ये फोर्ड ची एन्डोव्हर कार कार नाल्यात पलटी मारल्याने १२ वर्षीय सना अभिषेक अग्रवाल राहणार नागपूर जागीच मरण पावली. दुसरे तिचे काका अमिनेश अशोक अग्रवाल वय ४० वर्षे यांना नागपूर येथे अँबूलन्सने उपचाराकरिता नेताना उमरेड जवळ वाटेत मृत्यू झाला.येथील वळण एस या आकाराचे मार्ग असून नव्याने रोडचे काम सुरू असल्याने वाहनवरून नियंत्रण सुटले व अपघात घडला.
तर या कार मध्ये चालक ज्ञानेश्वर वसंता नरड वय ३८ वर्षे सह मिनू अमिनेश अग्रवाल ३२ वर्षे , नेहा आशिष अग्रवाल वय ३६ वर्षे , ईशु अनिमेश अग्रवाल वय १७ वर्षे असे एकूण ६ जण होते.

