ब्रह्मपुरीतील महिलांचा मनसे मध्ये पक्ष प्रवेश #chandrapur - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



ब्रह्मपुरीतील महिलांचा मनसे मध्ये पक्ष प्रवेश #chandrapur

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : ब्रम्हपुरी : 


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्मा. श्री.राज साहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन मनसे चे प्रदेश सरचिटणीस सन्मा. हेमंत भाऊ गडकरी यांच्या मार्गदर्शनात तसेच मनसे चे जिल्हा अध्यक्ष दिलीप रामेडवार, महिला जिल्हाध्यक्षा सौ.सुनिता ताई गायकवाड, मनविसे चे जिल्हा अध्यक्ष राहुल बालमवार यांच्या आदेशानुसार २ डिसेंबर रोजी ब्रह्मपुरी तालुकाध्यक्ष सुरज शेंडे, तालुका उपाध्यक्ष नितीन पोहरे तसेच शहर संघटक चंद्रशेखर रामटेके यांच्या नेतृत्वात महिलांनी मनसेत प्रवेश केला.

यावेळी पक्षाचे कार्य, विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन उपस्थितांनी केले लवकरच पुन्हा भव्य पक्ष प्रवेश व नागरिकांच्या विविध प्रश्नांवर आंदोलन उभारुन अन्यायाविरुद्ध लढण्याची ग्वाही तालुकाध्यक्ष सुरज शेंडे यांनी दिली.

यावेळी सौ प्रमिला नाकतोडे, धनश्री नाकतोडे,मालता ढोरे,शामल ढोरे,मिना ठेंगरी, ज्योती घोरमोडे, कविता घोरमोडे, अनिता नाकतोडे, दिपाली घोरमोडे, रेखा दिघोरे, मनिषा नाकतोडे, तृप्ती घोरमोडे,गिता धोटे,भारती नाकतोडे, मिना घोरमोडे, वैशाली घोरमोडे, प्रतिभा बनकर, रजनी सोनवाने,श्यामल मडावी,उषा रामटेके आदी उपस्थित होते.

Pages