डॉ. अशोक जिवतोडे यांच्या कुशल नेतृत्वात अॅड. अभिजित वंजारी यांचा विजय जनता महाविद्यालयातील सहविचार सभेने केली होती वातावरण निर्मीती 22 संघटनांनी केले अॅड. अभिजित वंजारी यांचे अभिनंदन #ashok-jivtode - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



डॉ. अशोक जिवतोडे यांच्या कुशल नेतृत्वात अॅड. अभिजित वंजारी यांचा विजय जनता महाविद्यालयातील सहविचार सभेने केली होती वातावरण निर्मीती 22 संघटनांनी केले अॅड. अभिजित वंजारी यांचे अभिनंदन #ashok-jivtode

Share This
खबरकट्टा / चंद्रपुर (प्रतिनिधी) :रविकांत वरारकर -



मागील 55 वर्षांचा नागपुर पदवीधर विधानपरीषदेचा भाजपाचा बालेकिल्ला ढासळून टाकत महाआघाडीचे उमेदवार अॅड. अभिजित वंजारी यांच्या विजयाने या मतदार क्षेत्रात परीवर्तन घडून आले आहे. प्राचार्य डॉ. अशोक जिवतोडे यांच्या कुशल नेतृत्वात अॅड. अभिजित वंजारी यांनी चंद्रपुर-गडचिरोली जिल्ह्यातून भरघोस मते मिळविली. राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या आजपर्यंतच्या ओबीसी जनजागृतीच्या कार्याचा फायदा या निवडणुकीत ओबीसी उमेदवाराला झाला. या विजयाने पुन्हा एकदा प्राचार्य डॉ. अशोक जिवतोडे यांचा पदवीधर मतदार संघामधे मोठ्या प्रमाणात प्रभाव असल्याचे स्पष्ट झाले आहे.


पालकमंत्री नाम. विजय वडेट्टीवार, खासदार बाळूभाऊ धानोरकर, माजी आमदार देवराव भांडेकर, डॉ. बबनराव तायवाडे, बाबासाहेब वासाड़े, प्राचार्य डॉ. अशोक जिवतोडे, प्राचार्य अनिल शिंदे, प्राचार्य सुर्यकांत खनके, आदींनी अभिनंदन केले आहे.


महाविकास आघाडीचे उमेदवार अॅड. अभिजित गोविंदराव वंजारी यांचे बावीस संघटनांनी अभिनंदन केले आहे. यामधे संस्थाचालक संघ, प्राचार्य फोरम, नुटा, यंग टीचर्स, विजुक्टा, मुख्याध्यापक संघ, चंद्रपुर जिल्हा मुख्याध्यापक असो., विमाशी संघ, पदविधर शिक्षक संघटना, पुरोगामी शिक्षक संघ, प्राथमिक शिक्षक संघ, चित्रकला शिक्षक संघ, एमसीव्हीसी, बायफोकल विभाग, म.रा. जुनी पेंशन हक्क संघठन, जि. चंद्रपुर, जेष्ट नागरीक संघ, वकील असोसिएशन, ओबीसी कर्म. संघटना, महा. शिक्षकेत्तर कर्म. संघटना, माध्यमिक शिक्षकेत्तर कर्म. संघटना, शिक्षकेत्तर कर्म. संघ., सेवानिवृत्त प्राथ.शिक्षक संघ, म.रा. उच्च माध्य. क. महा. शाळा कृती संघठना, म.रा.प्राथ. शिक्षक समिती, ओबीसी कर्म.अधीकारी संघटना, आदींचा समावेश आहे. 


जनता परीवारातर्फे देखील अॅड. अभिजित वंजारी यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.


जनता महाविद्यालयात संपन्न झालेल्या सहविचार सभेने प्रचारात वातावरण निर्मीती केली होती. ही सभा अॅड. अभिजित गोविंदराव वंजारी यांच्या प्रचारातील मुख्य बिंदू होती व सर्वात मोठी सभा होती. या सभेमधे पुर्णत: प्रत्यक्ष पदवीधर मतदार मोठ्या सन्ख्येने उपस्थित होते. चंद्रपुर, गडचिरोली, भंडारा, गोन्दिया जिल्ह्यात या सभेतून परीवर्तन संदेश पोहोचला होता व परीवर्तन घडून आले.





Pages