Wcl कोळसा खाणीत मातीचा ढिगारा कोसळून ड्रिल मशीन दबल्या : सुदैवाने जीवितहानी नाही #open cast mines - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



Wcl कोळसा खाणीत मातीचा ढिगारा कोसळून ड्रिल मशीन दबल्या : सुदैवाने जीवितहानी नाही #open cast mines

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 


कोळसा काढताना मातीचा ढिगारा कोसळला. यामध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी कोळसा काढण्यासाठी खाणीत असलेल्या तीन ड्रील मशीन, 1 पंप आणि ओसीबी पूर्णत: ढिगाऱ्याखाली दबल्या. 

ही घटना बुधवारी दुपारी 1:30 च्या सुमारास येथून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या मार्गावर असलेल्या पद्मापूर सेक्टर 4 या खुल्या कोळसा खाणीत घडली. यात वेकोलिचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.


खुल्या खाणीतून कोळसा काढण्याचे काम सुरू असताना दुपारच्या भोजनाची वेळ झाल्याने काही कामगार तेथून बाहेर निघाले होते. काहीजण तिथेच होते. कोळसा उत्खननासाठी आधी तेथील माती काढावी लागते. 


ही माती बाजूलाच टाकली जाते. यामुळे मातीचे महाकाय ढिगारे खाणीच्या सभाेवताल तयार झाले आहेत. 


यातील एका बाजूच्या ढिगाऱ्याची माती खचत असल्याचे काही कामगारांच्या निदर्शनास येताच त्यांनी तेथून पळ काढला. यामुळे ते थोडक्यात बचावले.

Pages