ब्रेकिंग : सुगंधित तंबाखूची वाहतूक : लाखो रुपये किमतिच्या मलासहित वाहन जप्त #nagbhid - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



ब्रेकिंग : सुगंधित तंबाखूची वाहतूक : लाखो रुपये किमतिच्या मलासहित वाहन जप्त #nagbhid

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 


नागभीड शहर व तालुक्यातील अनेक ठिकाणी सर्रास अवैध रित्या बंदी असलेला सुगंधी तंबाखू खुलेआम विक्री सुरु असल्याची वारंवार ओरड होत असतानाच नागभीड पोलीस स्टेशन अंतर्गत काल बुधवारी दिनांक 18नोव्हेंबर ला रात्री 10:30 वाजता दरम्यान अतीरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे आणि जिल्हा विशेष गुन्हे शाखा चंद्रपूरचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली व आदेशान्वये गुन्हे शाखा पथकाने नागभिड शहरातील प्रतिष्टीत किराणा व्यापारी हनिफ भाई जादा व त्यांचे ईतर सहकारी यांना सुगंधीत तंबाकू अवैध साठा भरलेली टाटा पिकअप पकडली. 



पीक अप क्रमांक एम एच 40 एन 674 या चारचाकी वाहनात लाखों रुपयांचे किंमतीचे सुगंधी तंबाकू चे पोते असलेले वाहन स्थानिक गुन्हे शाखेचे (lcb )पथकाने पोलिस स्टेशन नागभीड येथे मडामे पोलीस निरीक्षक नागभीड यांच्या अधिपत्या खाली जप्त केलेली गाडी पोलीस स्टेशनमध्ये जमा केली आहे.



मुख्य आरोपी हनिप जादा यांना अटक करण्यात आली आहे. असून संबंधित गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे.

Pages