राजूर येथील वार्ड क्र 3 मध्ये राहणाऱ्या सुनील विजय पाईकराव वय २७ ह्याने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना दिनांक 26 ला उघडकीस उघडकीस आली.
सुनील पाईकराव चे नोव्हेंबर 2020 च्या २९तारखेला ला लग्न ठरले होते. तो आपल्या लग्नाच्या तयारीत लागला होता. काळाचा घाला काय झाला कुणाला ठाऊक, जेमतेम लग्नाची तयारी पूर्णत्वास आली होती अन अचानकच घरी कुणीही नसताना त्याने गळफास घेतला आहे. तो आपल्या आई समवेत राहत होता. वडील फार पूर्वीच मयत झाले आहे. त्याच्या आत्महत्या मुळे त्याचा आईवर व कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले असून आत्महत्येचे कारण अजून अस्पष्टच आहे. मात्र लग्नाच्या आशेत असलेला सुनील जगाच्या पडद्याआड गेल्याने परिसरातील नागरिकांत व परिवारात हळहळ व्यक्त होत आहे.