ब्रेकिंग : बल्लारपूर नजीक झुडपी जंगलात आढळला युवकाचा संशयास्पद मृतदेह #suicide?? - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



ब्रेकिंग : बल्लारपूर नजीक झुडपी जंगलात आढळला युवकाचा संशयास्पद मृतदेह #suicide??

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : बल्लारपूर :- 



बल्लारपूर विसापूर फाट्याजवळ असलेल्या जवळपास 200 मीटर अंतरावर झुडपी जंगल आहे. त्या जंगलामध्ये इशांत परकोटवर वय 33 राहणार गणपती वार्ड बल्लारपूर ‌या युवकाचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे.

थोडक्यात माहितीनुसार दिनांक 23 नोव्हेंबर ला  सायंकाळी 5 वाजताच्या दरम्यान विसापूर फाट्याजवळ एका युवकाला दुर्गंधी चा वास येवू लागला, त्यामुळे त्याने जवळ जावून पाहले असता त्याला बेवारस अवस्थेत एक मृतदेह आढळून आल्याने याची माहिती त्याने पोलिसांना दिली. 

पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्याकरिता ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर येथे पाठविण्यात आला.

संबंधित युवकाजवळ विषाची बॉटल व इलेक्ट्रिक बिल मिळाले त्यामुळे सदर युवक बल्लारपूर येथील रहिवासी असल्याचे व 4 दिवसांपासून बेपत्ता असल्याचे कळते. अधिक तपास बल्लारपूर पोलीस करीत आहे.

Pages