🔥बर्निंग कार : अपघातग्रस्त गाडीने घेतला पेट #burning-car - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



🔥बर्निंग कार : अपघातग्रस्त गाडीने घेतला पेट #burning-car

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : - 


पोंभुर्णा तालुक्यातील आक्सापुर मार्गावर समोरासमोर धडक देत दोन गाडयांचा अपघात झाल्याची घटना आज सकाळी 10 वाजताच्या दरम्यान घडली. त्यातील एक अपघातग्रस्त गाडी पोंभूर्णा नेत असताना चिंतामणी कॉलेज जवळ अचानक घेतला पेट घेतला. 


सविस्तर माहिती नुसार,आज दिनांक 25 /11/2020 बुधवारला आक्सापुर-पोंभूर्णा मार्गावर सोनापूर बस स्टँड जवळ अपघात झाल्याची घटना दहाच्या सुमारास घडली. दोन्ही गाड्या चारचाकी असून, MH 34 BF 596 या गाडीचा चालक जखमी झाला.


जखमी चालकाला पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलवले आहेत. स्कार्पिओ ही गाडी अशोक गुंजेकर यांच्या मालकीची आहे तर, कार ही विनोद थेरे यांच्या मालकीची असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.


अपघात गाडीला (MH 34 BF 596)पोंभूर्णा पोलीस स्टेशन मध्ये नेत असताना चिंतामणी कॉलेज पोंभूर्णा जवळ अचानक पेट घेतल्याने गाडी पूर्णपणे जळून खाक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. 


काही काळासाठी त्या ठिकाणी ताण तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. पोंभुर्णा पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करीत आहेत.

Pages