ब्रेकिंग मर्डर : शेतीच्या वादात युवकाची हत्या -जिल्ह्यात हत्यांचे सत्र #murder - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



ब्रेकिंग मर्डर : शेतीच्या वादात युवकाची हत्या -जिल्ह्यात हत्यांचे सत्र #murder

Share This
खबरकट्टा / वरोरा :-


बल्लारपूर येथे शुल्लक वादातून युवकाची हत्या झाल्याची घटना ताजी असतानाच जिल्ह्यात आज आणखी एक हत्त्येची घटना उघडकीस आली आहे. 

वरोरा तालुक्यातील बोर्डा गावचा रहिवासी असलेल्या शेखर नथू सरोदे (वय 32 वर्षे) याची शेती सागरा वाघेडा या गावी आहे. शेखर नथू सरोदे यांनी शेतात सोयाबीन चे पीक घेतल्यानंतर शेतामध्ये हरभरा पेरला शेत मालाचे जनावरांपासून संरक्षण करण्यासाठी काटेरी कुंपणाचे काम करीत असताना चुलत भाऊ प्रफुल गुलाब सरोदे याचाशी शेतीच्या जागेसाठी वाद झाला.


पुढे वाद इतका विकोपाला गेला की वादाचे रूपांतर हानामारीत झाले आरोपी प्रफुल सरोदे व विशाल आगलावे यांनी शेखर सरोदेला लाठ्या-काठ्या नी मारहाण केली त्यात शेखरच्या जागीच मृत्यू झाला मृत्यू देह शेतातील विहिरीच्या जवळ फेकून आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला.

या घटनेतील आरोपी प्रफुल गुलाब सरोदे ( रा. सागरा ) विशाल आगलावे (वरोरा भांजी वार्ड) असून दोन्ही आरोपींना वरोरा पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.


Pages