वढा -कार्तिकी यात्रा रद्द : कुणीही दुकाने लावू नये व गर्दी करू नये, आढळून आल्यास कायदेशीर कारवाई - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



वढा -कार्तिकी यात्रा रद्द : कुणीही दुकाने लावू नये व गर्दी करू नये, आढळून आल्यास कायदेशीर कारवाई

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : घुग्घुस : 


चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस जवळ जवळच्या वर्धा, पैनगंगा आणि निर्गुडा नदीच्या त्रिवेणी संगमावर आषाढी कार्तिक पौर्णिमे निमित्ये यात्रा भरते. वढा या ठिकाणी विठ्ठल रुख्मिणीचे पुरातन मंदिर असल्यामुळे आणि त्रिवेणी नदीच्या संगमावर असल्याने यात्रेसाठी प्रसिद्ध आहे.




दरवर्षी कार्तिक पौर्णिमेला मोठी यात्रा भरते व तीन दिवस ही यात्रा चालते,  यामुळे विदर्भातील व परिसरातील मोठ्या प्रमाणात भाविक भक्त या ठिकाणी येत असतात म्हणून या स्थानाला छोटा पंढरपूर म्हूणन ओळखल्या जाते भाविक भक्त गंगा स्नान करून विठ्ठल रुख्मिणीचे देव दर्शन घेतात. 




परंतु, यावर्षी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता प्रतिबंधात्मक उपाययोजना करणेकरीता जिल्हाधिकारी यांनी कलम, 144 जमावबंदी आदेशानुसार मौजा वढा येथील यात्रा महोत्सव रद्द करण्याचा आदेश दिला आहे कुणीही दुकाने लावू नये व गर्दी करू नये असे आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

Pages