50 लाख गरीब महिलांसाठी डॉ.नीलमताई गोऱ्हे यांचीं धडपड : महाराष्ट्रातील उमेद कंत्राटी कर्मचारी व उमेद अभियानाला देणार बळकटी #umed - खबरकट्टा

.com/img/a/

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

.com/img/a/
demo-image

50 लाख गरीब महिलांसाठी डॉ.नीलमताई गोऱ्हे यांचीं धडपड : महाराष्ट्रातील उमेद कंत्राटी कर्मचारी व उमेद अभियानाला देणार बळकटी #umed

Share This
.com/img/a/
खबरकट्टा / महाराष्ट्र : 


दि.२७ नोव्हेंबर २०२० रोजी मा.डॉ.नीलम ताई गोऱ्हे उपाध्यक्ष विधान परिषद महाराष्ट्र यांनी उमेद विभागाच्या कंत्राटी कर्मचारी व महिलांचे csc या खाजगी संस्थेकडे वर्ग करणे धोरण व प्रश्न समजून घेणे साठी “उमेद महाराष्ट्र राज्य कल्याणकारी मंडळ” पदाधिकारी यांच्याशी(VC) दूरदृष प्रणाली द्वारे बैठक घेण्यात आली. 


सदर बैठकी दरम्यान डॉ.नीलम ताईंनी उमेद च्या मागील दोन महिन्यातील लढा संपूर्ण घडामोडी,कंत्राटी कर्मचारी यांचा संघर्ष माहिती जाणून घेतली व खेद व्यक्त केला की शासनाच्या एका उत्कृष्ट योजनेचे त्रयस्थ संस्थेचा हस्तक्षेप का होत आहे आणि आश्वासन दिले की याबाबत “मा.मुख्यमंत्री व मा.ग्रामविकास मंत्री व ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब व विरोधी पक्षनेते या सर्वांशी पत्र व्यवहार करून,याबाबत माहिती जाणून घेत तसेच केंद्र शासनाला सुद्धा पत्र व्यवहार करण्यात येईल,CSC eGovD बाबत माहिती जाणून घेण्यात येईल व या संस्थेला वार्षिक ३० ते ४० कोटी खर्च वाढवून शासन का त्रयस्थ संस्थेला अभियान देत आहेत.


ग्रामीण भागातील होतकरू तरुण या अभियानात जीव लाऊन काम करत आहेत. आज अभियान चांगल्या फलनिष्पती कडे वाटचाल करत असताना असा निर्णय कैबिनेट बैठकी शिवाय कसा झाला याबाबत ही आश्चर्य व्यक्त करून याबाबत निश्चित पुढाकार घेऊन मदत केली जाईल या बाबत आश्वासन दिले. महाराष्ट्रातील सर्व गरीब बचत गटातील महिला,समुदाय संसाधन व्यक्ती यांच्यासाठी मी स्वतः पुढाकार घेऊन पुढील निर्णयासाठी मा.मुख्यमंत्री यांच्याशी संवाद करेल हे आश्वासन देत कंत्राटी कर्मचारी यांना आधार दिला. 


सदर बैठकीस उमेद महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष चेतना लाटकर,सचिव डॉ.बलवीर मुंढे,उपाध्यक्ष नीरज नखाते,सुधीर खुजे व कोषाध्यक्ष स्वप्नील शिर्के इ.यांनी आपले मत नोंदविले. यासाठी डॉ.नीलम गोऱ्हे यांचे स्विय सहायक श्री.योगेश जाधव साहेब व सचिव रवींद्र खेबुडकर सर यांनी मार्गदर्शन व सहकार्य केले.
Comment Using!!

Pages