राज्यात बचत गटाचे काम सुव्यवस्थित होण्याच्या दृष्टीने शासनाने उमेद अभियानाची स्थापना केली. महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना सर्व सक्षम करण्यासाठी उमेद अभियानावर शासन स्तरावर भरपूर प्रमाणात निधी पण उपलब्ध होतो.त्यांचं प्रमाणे हे अभियान व्यवस्थित राबविले जावे म्हणून गाव पातळी पासून ते जिल्हा अभियान व्यवस्थापका पर्यंतची अनेक पदे तयार करण्यात आली आहेत.
तालुका अभियान व्यवस्थपक हा त्या तालुक्यातील उमेद अभियाना अंतर्गत महिला बचत गट आणि संमधीत सक्षमीकरण कार्यावर लक्ष ठेवतो.पण या अभियान व्यवस्थापकास जर अवेळी बदली चा दंडुक येत असेल तर त्याने काम कसे करायचे आणि योजना कश्या राबवायच्या ,त्यातच मुलांचे शिक्षण, सुरू असलेले शाळेचे सत्र,माधातच आल्याने असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.
आज जिल्ह्यातील उमेद तालुका अभियान व्यवस्थापकांच्या माधातच बदल्या काढण्यात आल्यामुळे अनेक तर्क वितर्क काढण्यात येत आहेत,कारण रेग्युलर असो की कंत्राटी कामगार असो बदलीचे नियम सर्वांनाच सारखे आहेत,, मग ह्या बदल्या कोण्या एका व्यक्तीला तर विशिष्ट ठिकाणी आणण्यासाठी केल्या तर नाहीत असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कारण काही दिवसांनी विधानसभा निवडणूका आहेत आणि उमेद कडे बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे पाठबळ आहे, याचा फायदा घेण्यासाठी तर ह्या नियम धाब्यावर बसवून बदल्या करण्यात तर आल्या नाहीत ना अशी चर्चा सुरू आहे
एकंदरीतएका महिला राजकीय नेत्याला त्यांच्या एका जवळीक असलेल्या उमेद अभियान व्यवस्थापकास बाहेरच्या तालुक्यातून आपले मतदार क्षेत्र असलेल्या तालुक्यात आणायचे होते आणि आपली राजकिय पोळी लाटून घ्यायची आहे. म्हणून 24 लोकांना वेठीस धरून ह्या बदल्या करण्यात आल्या असल्याची खमंग चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.