धानोरकर भाजप च्या उमेदवार???#pratibhadhanorkar #bjp #congress - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



धानोरकर भाजप च्या उमेदवार???#pratibhadhanorkar #bjp #congress

Share This

“भाजपात कोण जाणार, एकदाचा सोक्षमोक्ष लावा,” काँग्रेस आमदार सुभाष धोटे यांनी आजच प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंकडे मागणी केली असतानाच खात्रीलायक सूत्रांकडून माहिती कळते आहे की दिवंगत खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांच्या श्रीमती आमदार प्रतिभा धानोरकर या काँग्रेस ने तिकीट नाकारल्यास भाजप कडून चंद्रपूर-वणी-आर्णी निर्वाचन क्षेत्राच्या उमेदवार होऊ शकतात?

खबरकट्टा /राजकीय -7 मार्च 2024

लोकसभा 2024 निवडणुकीचे वारे जोरात वाहत आहेत यात निर्वाचन क्षेत्रातील सर्वच उच्चपादस्थ नेते दिल्ली वारी करून उमेदवारी आपल्या पदरात पाडून घेण्यास इच्छुक असतानाच चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्रात मोठा राजकीय भूकंप होतं असल्याची खात्रीलायक माहिती आज 7 मार्च ला रात्री 10च्या दरम्यान समोर येत आहे.

अश्या स्थितीत महाराष्ट्रातून काँग्रेसचे एकमेव निवडून आलेले तत्कालीन खासदार
 सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांच्या श्रीमती आमदार प्रतिभा धानोरकर या लोकसभा उमेदवारीला स्वपक्षातला वाढता विरोध बघून मुलांच्या भविष्यातील राजकीय संधी टिकून रहाव्यात या करणावरून भाजप पक्षाची उमेदवारी एनवेळी स्वीकारतील अशी चर्चा खुद्द श्रीमती धानोरकर यांनीच अनेकांसोबत केल्याने चंद्रपूर च्या हाय प्रोफाइल राजकीय पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड चर्चा सुरु झाली आहे.

दरम्यान आजच काँग्रेस चे राजुरा येथील आमदार व ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंकडे“भाजपात कोण जाणार, एकदाचा सोक्षमोक्ष लावा,” अशी मागणी केली असतानाच धानोरकरांच्या यां राजकीय पलटी घेण्याचा अंदाज त्यांना होता की काय असेही चर्चेत आहे.मात्र धानोरकर यांनी ऐनवेळी भाजप ची उमेदवारी स्वीकारल्यास काँग्रेस ला जबर धक्का तर् मानल्या जाईलच सोबतच जिल्ह्यातील ओबीसी मतदार काय निर्णय घेतील यावरसुद्धा निवडणुकीची चुरस राहील.

Pages