अ‍ॅड. पुरुषोत्तम सातपुते यांचा काँग्रेस ला रामराम #congress - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



अ‍ॅड. पुरुषोत्तम सातपुते यांचा काँग्रेस ला रामराम #congress

Share This
खबरकट्टा / राजकीय :

आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहत असून चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा निर्वाचन क्षेत्राचे वातावरण आता हळूहळू उष्ण व्हायला सुरुवात झाली आहे.यातच हे ओबीसी मतदार बहुल क्षेत्र असल्याने या क्षेत्रातील 23% कुणबी मतांची आकडेवारी सर्वच राजकीय पक्षांना आकर्षित करत असते.

याच आकर्षनातून दोन्ही मोठ्या राष्ट्रीय पक्षातील भावी लोकसभा खासदारांना कुणबी समाज आपल्या बाजूने असावा असे वाटत असल्याने समाजातील अनेक जातीय पदाधिकाऱ्यांना आपल्या बाजूने वाळविण्याची रस्सीखेच दिसून येत आहे. अश्याच खेचाखेचिच्या राजकारणात मागील आठवड्यात काँग्रेस चे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांनीअ‍ॅड. पुरुषोत्तम सातपुते यांची जिल्हा काँग्रेस च्या सल्लागार मंडळावर नियुक्ती करत जातीय समकरणात काँग्रेस ने बाजी मारल्याचे सुचविले असतानाच आज 5फेब्रुवारी ला अ‍ॅड. पुरुषोत्तम सातपुते यांनी अल्पवाधितच काँग्रेस ला रामराम ठोकला आहे.


दोन्ही राष्ट्रीय पक्षात लोकसभा उमेदवारी करीता उमेदवारांची रस्सीखेच सुरु असून शेवटच्या क्षणापर्यंत कोणत्या पक्षाचे तिकीट कुणाला जाईल याचा अंदाज बांधणे कठीण झाले असले तरीही ओबीसी उमेदवाराला तिकीट मिळण्याची शक्यता दोन्ही पक्षाच्या झालेल्या राजकीय चाचपणी सर्वेतून समजते. त्यामुळे यां निर्वाचन क्षेत्रात दोन्ही ओबीसी उमेदवार असल्यास जातीय मतदानात उभी फूट बघायला मिळू शकते अश्या वेळेस धनोजे कुणबी मध्यवर्ती समाज मंडळ, चंद्रपूर चे अध्यक्ष
 असलेल्या अ‍ॅड. पुरुषोत्तम सातपुते यांची राजकीय भूमिका महत्वाची ठरू शकते त्यामुळे त्यांच्या या राजीनामा पत्रामुळे अनेक राजकीय चर्चानां जिल्ह्यात वाव मिळत आहे.

सल्लागार नियुक्ती बाबत अ‍ॅड. पुरुषोत्तम सातपुते यांचा खुलासा 
काही दिवसांपूर्वी माझी चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमेटीवर सल्लागार नियुक्त केल्याची बातमी वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आली. मी सामाजिक क्षेत्रात काम करीत असून माझा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही. यासंबंधाने माझी कोणतीही पूर्व परवानगी न घेता माझी चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमेटीवर सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली. यामुळे ती नियुक्ती मला मान्य नाही. याबाबत संभ्रम राहू नये म्हणून खुलासा. - अँड.पी.एम सातपुते

Pages