मुख्यमंत्री दौरा : मुख्यमंत्री अम्मा च्या भेटीला ; माजी नगरसेवक पप्पू देशमुख पोलिसांच्या निगराणीत #cmeknathshinde - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



मुख्यमंत्री दौरा : मुख्यमंत्री अम्मा च्या भेटीला ; माजी नगरसेवक पप्पू देशमुख पोलिसांच्या निगराणीत #cmeknathshinde

Share This
जन विकास सेनेचे संस्थापक तथा माजी नगर सेवक पप्पू देशमुख यांनी एका पत्र प्रसिध्दीतून कळविले होते की, नवीन भूमिगत गटार योजनेचे भूमिपूजन विसापूर येथे करण्यात येणार आहे. ते पुढे बोलले की, योजना चंद्रपूर शहराची आणि भूमिपूजन विसापुरात हा अजब प्रकार आहे.शहरातील सर्व रस्ते खोदून 506 कोटी रुपयांच्या भूमिगत गटार योजनेसाठी पाईपलाईन टाकण्याच्या कामाचे भूमिपूजन', असे स्पष्ट फलक लावून मनपा प्रशासनाने चंद्रपूर शहराच्या आत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन करण्याची हिम्मत दाखवावी असे आव्हान पप्पू देशमुख यांनी प्रशासनाला दिले होते.या पार्श्वभूमीवर आणि मुख्यमंत्री च्या चंद्रपूर आगमन निमित्त सुरक्षेच्या दृष्टीने रामनगर पोलीस यांनी आज सकाळी 11 वाजता पप्पू देशमुख यांना वरोरा नाका वरून ताब्यात घेऊन रामनगर पोलीस स्टेशन येथे ठेवले आहे.

खबरकट्टा / चंद्रपूर :

मुलगा आमदार असूनही बांबूच्या टोपल्या विकत आपल्या व्यवसायाशी एकनिष्ठ असलेल्या चंद्रपूरातील अम्मा म्हणजेच आमदार किशोर जोरगेवार यांच्या 80 वर्षीय मातोश्री गंगुबाई जोरगेवार (MLA Mother Sells Bamboo baskets). यांच्या या साधेपणाने सगळ्यांची मन जिंकली आहेत.

चंद्रपूर ( Chandrapur ) विधानसभा क्षेत्रातील अपक्ष आमदार किशोर जोरगेवार ( Independent MLA Kishor Jorgewar ) यांच्या आई "अम्मा" म्हणून सुपरिचित आहेत. आपल्या मुलांना त्यांनी मोठ्या कष्टाने आणि संघर्षाने घडविले आहे. आजही त्या टोपली विकण्याचे काम करतात. त्यांच्या या असामान्य कार्याची दखल घेत एका वृत्तपत्र समूहाच्या महाराष्ट्र आयडल या उपक्रमाअंतर्गत "मदर हु ईन्सपायर" हा पुरस्कार देण्यात आला असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांनी थेट अम्माला फोन करून शुभेच्छा दिल्या होत्या.हा व्हिडिओ कॉल होता. त्यांच्या कार्याला सलाम करत मुख्यमंत्र्यांनी त्यांना थेट वर्षा बंगल्यात येण्याचे आग्रहाचे निमंत्रण दिले होते.

या निमंत्रणाची आठवण ठेऊन महाकाली महोत्सव दरम्यान मुख्यमंत्र्यांनी अम्मा ची भेट घेण्याची संधी हुकल्यानंतर आज चंद्रपूर जिल्ह्यातील पालकमंत्री सुधीर मुनगंटीवारयांच्या संकल्पनेतून साकारलल्या "फिरते जनसंपर्क कार्यालय" लोकार्पण सोहळ्याचे उदघाट्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्रद्धेय श्री अटल बिहारी वाजपेयी बॉटनिकल गार्डन विसापूर, जिल्हा चंद्रपूर येथे होणार असल्याने ते आज चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यादरम्यान मुख्यत्र्यांनी स्वतः आमदार जोरगेवार यांना दूरध्वनी वरून अम्मा यांना भेटण्याची इच्छा दर्शविली. विसापूर येथील कार्यक्रम आटोपून मुख्यमंत्री खास अम्मा च्या भेटीला आ. जोरगेवार यांच्या निवासस्थानी भेट घेणार आहेत.

Pages