महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आजच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. अशोक चव्हाण यांनी कालच काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर दोन दिवसात निर्णय घेऊ, असं अशोक चव्हाण म्हणाले होते. मात्र आजच ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज दुपारी 12 वाजता अशोक चव्हाण यांचा भाजप प्रवेश होणार आहे. भाजपच्या प्रदेश कार्यालयात आज हा पक्षप्रवेश होणार आहे. त्यानंतर साडे 12 वाजता चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद होणार आहे.#ashokchavhnan #bjp
https://twitter.com/AshokChavanINC/status/1756986594936955121कुठे आणि कधी होणार पक्षप्रवेश?
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस अशोक चव्हाण आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. आज दुपारी 12 वाजता मुंबईतील भाजपच्या पक्ष कार्यालयात हा पक्षप्रवेश होणार आहे. आमदार अमर राजूरकर हेदेखील अशोक चव्हाण यांच्यासोबतच भाजपमध्ये जाणार आहेत.
मागच्या काही दिवसांपासून अशोक चव्हाण हे भाजपमध्ये जातील अशी चर्चा आहे. त्यानंतर आता काल अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करतील, असे तर्क लावले गेले. अखेर आज अशोक चव्हाण भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणार आहेत.
समर्थीत आमदार कधी करणार पक्ष प्रवेश?अशोक चव्हाण यांच्या समर्थनाथ 15 ते 18 काँग्रेस आमदार असून, विधानपरिषदेचे माजी आमदार अमर राजूरकर यांनीही काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला. महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ संपायला सहा महिने अवधी असून आता दुसऱ्या पक्षात प्रवेश केल्याने पक्षांतर बंदी कायदा लागू होईल शिवाय राज्यसभेच्या 27 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतदानाकारीत आमदार अपात्र होऊ नयेत म्हणून समर्थक आमदार "सध्यातरी आम्ही काँग्रेस सोबतच" अश्या भूमिकेत असल्याचे कळते.