*सार्ड संस्था चंद्रपूर आणि ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर यांचे संयुक्त विद्यमाने वन्यजीव सप्ताह निमित्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले, वन्यजीव व पर्यावरण यांचे संरक्षण आणि संवर्धन करा हा संदेश घेऊन रॅलीचे आयोजन करण्यात आले . या रॅलीकरिता मोहूर्ली वनपरीक्षेत्राचे अधिकारी श्री थिपे साहेब यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवून रॅलीला सुरवात झाली. सायकल रॅली जटपुरा गेट पासून सुरवात होऊन अंचलेश्वर गेट-पठाणपूरा गेट- बिनबा गेट ते वरोरा नाका या ठिकाणापर्यंत करण्यात आली. या रॅलीला पर्यावरणतज्ज्ञ श्री सुरेशजी चोपणे यांनी मार्गदर्शन केले.
संस्थेचे अध्यक्ष भाविक येरगुडे, विलास माथनकर,सुबोध कासुलकर,नितीन डोंगरे,मंगेश लहामगे यांनी रॅली यशस्वी करण्याकरिता विशेष परिश्रम घेतले. या रॅलीमध्ये श्री महेंद्र राळे,वसंत वडस्कर,सचिन ढेंगळे,सुभाष पाऊनकर, श्रीजा येरगुडे , श्रीअंश येरगुडे,सचिन निंबाळकर, राजू पिदूरकर,दिलीप नेरलवार, अमित कुकडवार,अनंत भूषकमवार, विवेक दुबेवार,विवेक टहलानी, राजू मडमवार,स्वप्नील गुंडावार,अमित अदेटीवार,विजय नेरलवार,मुक्तेश्वर मेश्राम,किशोर तुमेवर,इत्यादींनी सहभाग घेतला