खबरकट्टा /चंद्रपूर
चंद्रपूर, 27 सप्टेंबर 2023: चंद्रपूर जिल्ह्यातील सावली पंचायत समितीच्या शिक्षण विभागात लाचलुचपत विभागने धाड टाकली. यात गट शिक्षण अधिकारी लोकेश खंडारे यांना लाच घेतांना रंगेहाथ पकडण्यात आले. खंडारे यांनी एका शिक्षकाला लाच मागितल्याचा आरोप आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, लोकेश खंडारे यांनी जि. प. शाळा राजोली फाल येथील माजी शिक्षक मिलिंद चांदेकर यांचेकडून लाच घेतली. या शिक्षकाने याबाबत लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. तक्रारीच्या आधारे विभागाने खंडारे यांच्या कार्यालयात छापेमारी केली. यावेळी खंडारे शिक्षकांकडून लाच घेत असताना रंगेहाथ पकडण्यात आले. ही रक्कम किती होती, याबाबत अधिक माहिती प्राप्त झालेली नाही. खंडारे यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे सावली पंचायत समितीच्या शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे. लाचलुचपत विभागाच्या या कारवाईमुळे भ्रष्टाचारविरोधात एक मोठा संदेश मिळाला आहे. अधिक तपास सुरु असून, सविस्तर बातमी लवकरच अपडेट करण्यात येईल.