सोशल मिडीयावर बदनाम करण्याची व जिवे मारण्याची धमकी देन खंडणी मागणारे स्वतःस डिजीटल मिडीयाचे पत्रकार म्हणुन घेणाऱ्या लिमेशकुमार जंगम याचेवर खंडणीचा गुन्हा दाखल #extortion - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



सोशल मिडीयावर बदनाम करण्याची व जिवे मारण्याची धमकी देन खंडणी मागणारे स्वतःस डिजीटल मिडीयाचे पत्रकार म्हणुन घेणाऱ्या लिमेशकुमार जंगम याचेवर खंडणीचा गुन्हा दाखल #extortion

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथे दिनांक 9 ऑगस्ट, 2023 रोजी ट्रॉन्सपोर्ट व्यवसायीक फिर्यादी नामे सुरज अरविंद ठाकरे यांनी रिपोर्ट दिली की, त्यांच्या कामगार संघटनेच्या माध्यमातुन समाजकार्य करीत असुन दरम्यान त्यांची सोशल मिडीयावरून लिमेश कुमार जंगम रा. महाकाली कॉलरी चंद्रपूर यांचेशी ओळख झाली व माहे जानेवारी 2023 मध्ये लिमेशकुमार जंगम यांनी फिर्यादीकडुन आर्थिक मदत म्हणुन पैसे स्विकारले होते. त्यानंतर त्याने फिर्यादीकडुन वारंवार पैशाची मागणी केली.

फिर्यादीने आर्थीक अडचण असल्याचे सांगितल्यावर सुध्दा लिमेशकुमार जंगम हा पत्रकारीतेचा फायदा घेवुन "तु जर मला पैसे दिले नाही, तर तुला कामगार संघटनेत बदनाम करून तुझी राजकीय कारकिर्द संपुष्टात आणतो व नुकसान पोहचवितो, तसेच सोशल मिडीयावर तुझी बदनामी करतो," अशी भिती घालुन धमकी दिली व खंडणी न दिल्यास जिवे मारण्याची धमकी देवून फिर्यादीकडुन गुगल-पे व नगदी स्वरुपात खंडणी घेतली.

अशा प्रकारे लिमेशकुमार जंगम याने सोशल मिडीयावर बदनाम करण्याची धमकी देवुन फिर्यादीकडुन एकुण 35000 /- रुपये खंडणी वसुल केले फिर्यादीचे रिपोर्टवरून पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथे DIGITAL MEDIA EXPOSED, Chandrapur Exposer, व KABEERA (Invesigation and Research Pvt.Ltd) चे डायरेक्टर / एडिटर / पत्रकार असलेले लिमेश कुमार जंगमयाचे विरुध्द खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हयाचा सखोल तपास सहायक पोलीस निरीक्षक श्री रमीझ मुलानी, पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर हे करीत आहे. तरी याद्वारे सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की सदर इसमाने कोणाही नागरीकांकडून खंडणी वसुल केली असेल किंवा इतर काही तकार असेल तर त्याबाबत नागरीकांनी न घाबरता पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथे तक्रार नोंदवावी.

Pages