चंद्रपूर – जुनोना मार्गावर दुचाकीने भरधाव वेगाने जाणाऱ्या युवकाचा भिषण अपघात झाला, यात युवकाचा डावा पाय मोडला, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे रोहित इटकलवार, वय 25 वर्ष, राहणार देवाडा, तालूका पोंभूर्णा असे अपघातग्रस्त युवकाचे नाव आहे.
चंद्रपूर वरून दिनांक 10 ऑगस्ट रोजी संध्याकाळी देवाडा येथील आपल्या घरी रोहित इटकलवार परत जात असतांना आपल्या दुचाकी स्पोर्ट बाईक वाहनाने भरधाव वेगाने जात असतांना जुनोना मार्गावर वाहणावरील नियंत्रण सुटल्याने तो खाली कोसळला यात त्याचा डावा पाय मोडला.
जुनोना मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांनी व जुनोना चौकातील नागरिकांनी त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेप्रकृती चिंताजनक असल्याने त्याला नागपूरच्या रुग्णालयात हलविण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे.