API Pramod Shinde API प्रमोद शिंदेंची तत्परता कौतुकास्पद#chandrapur - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



API Pramod Shinde API प्रमोद शिंदेंची तत्परता कौतुकास्पद#chandrapur

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर :कोरपना

कोरपना तालुक्यातील औद्योगिक नगरी गडचांदूर,येथील पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांची तत्परता व सतर्कतेमुळे एक वयोवृद्ध व्यक्ती सुखरूप घरी पोहचला. यासंदर्भात सविस्तर असे की, 2 आगस्त रोजी रात्री अंदाजे 9 च्या दरम्यान गडचांदूर बसस्थानक परिसरातील प्रसाधनगृहासमोर आसन (बू) येथील एक वयोवृद्ध व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत पडून होता. पावसात भिजल्याने तो थंडीत कुडकुडत होता. सदर व्यक्तीची अवस्था पाहून रात्रीच्या सुमारास याची प्रकृती बिघडण्याची शक्यता होती. याला रूग्णालयात पाठवणे गरजेचे होते.

 ही बाब लक्षात घेऊन एका सुज्ज्ञ नागरिकाने सहाय्य पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांना दूरध्वनीवरून याची माहिती दिली. API शिंदे यांनी माहितीची गंभीरता लक्षात घेऊन लगेच महिला पोलीस हवालदार प्रिया चंद्रागडे व पोलीस कर्मचारी युनूस शेख यांना पाठवले. पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून सदर व्यक्तीची विचारपूस केली असता त्याच्या मुलाचा दुरध्वनी क्रमांक मिळाला. पोलिसांनी त्याच्याशी संपर्क करून माहिती दिली. तेव्हा काही वेळानंतर त्या वृद्ध व्यक्तीचा मुलगा आणि नातू, हे दोघेही गडचांदूर येथे आले आणि पोलिसांचे आभार मानत त्याला एका चारचाकी वाहनाने घरी नेले.

बरेचदा पोलीस वेळेवर पोहोचत नसल्याचे आरोप होताना आपण पाहिले. एकीकडे पोलिसांच्या कामगिरीवर विवीध प्रकारे आरोप होता असताना दुसरीकडे मात्र, याठिकाणी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांनी दाखवलेली तत्परता आणि सतर्कतेमुळे एका वृद्ध व्यक्तीला सुखरूप घरी पोहोचता आले. सपोनी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला व पुरूष पोलीस कर्मचाऱ्यांची ही कामगिरी कौतुकास्पदच म्हणावी लागेल.


Pages