चनई बू येथील तरुण शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू...#A young farmer in Chanai Bu died due to lightning - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



चनई बू येथील तरुण शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू...#A young farmer in Chanai Bu died due to lightning

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:

कोरपना - तालुक्यातील खैरगाव ( सावलहिरा )येथील एका शेत शिवारात पिकाला फवारणी करत असताना चनई बू येथील एका शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाल्याची घटना बुधवार दिनांक 26 ला सायंकाळी चार वाजता च्या सुमारास घडली.#khabarkatta chandrapur

पुरुषोत्तम अशोक परचाके (25) रा.चनई बू असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. शेत पिकाची फवारणी करत असताना. अचानकरीत्या अंगावर विज पडल्याने त्याचा मृत्यू झाला. सदर शेतकऱ्याचे चार महिन्या अगोदरच लग्न झाले होते. त्यांच्या मागे पत्नी , आई वडील, मोठा भाऊ व बराच मोठा आप्त परिवार आहे.त्यांच्या मृत्यूने गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.#khabarkatta chandrapur

Pages