खबरकट्टा/चंद्रपूर:
विद्यार्थी प्रतिनिधी साठी राबवली गुप्त मतदानपद्धती ..श्री शिवाजी इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मधील उपक्रम नांदा फाटा प्रतिनिधी.. कोरपना तालुक्यातील इंग्रजी माध्यमाची नामांकित शाळा म्हणून ओळख असलेल्या श्री शिवाजी इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज नांदाफाटा येथे नुकतीच विद्यार्थी प्रतिनिधी साठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली.#khabarkatta chandrapur
या निवडणक प्रक्रियेमध्ये लोकशाही मतदान पद्धती प्रमाणे ii विद्यार्थ्यांना बॅलेट पेपर देऊन चिन्हांवर रबरिफुलीचा शिक्का मारून गुप्तमतदान करण्यात आले. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांसह शिक्षक प्राचार्य तथा उपप्राचार्य कर्मचारी यांनीही विद्यार्थी प्रतिनिधी करिता मतदान केले. सदर निवडून नोकरीसाठी शाळेतील 15 उमेदवार उभे होते.
त्यांच्या प्रचारासाठी आठ दिवसाचा वेळही देण्यात आलेला होता. सदर निवडणुकीमध्ये विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून कादिर राजा सिद्दिकी व विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून विदिका पिंपळ कर विजय झाल्या .निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याकरता निवडणुका अधिकारी म्हणून प्रकाश उपरे यांनी काम सांभाळले. शिक्षक मनीषा भट्टड केदार उरकुडे स्मिता दास निशा गुप्ता पल्लव साह सचिन सातपुते गजानन जगनाडे प्रशांत उपरे यांनी विशेष परिश्रम घेतले.