जिल्ह्यात व शहरात सकाळी आठ वाजता पासून मुसळधार पाऊस सुरू आहे. सलग आठ तासापासून सुरू असलेल्या पावसामुळे संपूर्ण चंद्रपूर जलमय झाले आहे. सर्व प्रमुख रस्तावर पाणीच पाणी साचले आहे. खोल भागातील वस्त्या व शेकडो घरात पावसाचे पाणी शिरले आहे.#khabarkatta chandrapur
शहरात पहाटेच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. मात्र सात वाजताच्या सुमारास पाऊस थांबला होता. त्यानंतर पुन्हा आठ वाजता पासून मुसळधार पाऊस सुरू झाला. या पावसाचा जोर इतका तीव्र होता की काही मिनिटातच शहरातील सर्व प्रमुख रस्ते जलमय झाले. गेल्या आठ तसापासून सलग हा पाऊस सुरू असल्याने शहरातील गांधी चौक ते जटपुरा गेट या मार्गावर सर्वत्र गुडघ्या इतके पाणी साचले आहे. लक्ष्मी नारायण मंदिर, लोकमान्य टिळक विद्यालय आझाद बगीचा चौक, जयंत टॉकीज या भागात तर माणसाच्या कंबर भर पाणी साचले आहे.
या रस्त्यावरील सर्व दुकानात पाणी शिरले आहे. मोहित मोबाईल, शंकराश्रम, चंद्रपूर वन विभागाचे कार्यालय तथा बगीचा समोरील दुकानांची चाळ यात पाणी शिरले आहे. या मार्गावर मोठा नाला आहे. पावसाळ्यापूर्वी या नाल्याची सफाई केली तेव्हा द्रेनेजचे झाकण लावले नाही. पाण्यात नाल्याचे खड्डे न दिसल्याने अनेक विद्यार्थी, मुले, पुरुष, महिला या खड्यात कोसळल्या. सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही.#khabarkatta chandrapur