पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी:दोन तासात आरोपीला अटक,एकुण दोन आरोपी तर एक आरोपी नाबालीग...#Remarkable performance of the police: The accused was arrested within two hours, two accused and one accused minor - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी:दोन तासात आरोपीला अटक,एकुण दोन आरोपी तर एक आरोपी नाबालीग...#Remarkable performance of the police: The accused was arrested within two hours, two accused and one accused minor

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:

राजुरा येथे अज्ञात इसमाने केलेल्या अंधाधुंद गोळीबारात भाजयुमो नेते सचिन डोहे ह्यांची पत्नी पूर्वशा हीचा जागीच मृत्यू झाला असुन अन्य एका व्यक्तीच्या पाठीला गोळी लागल्याने त्याला चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे.

प्राप्त माहितीनुसार सोमनाथपूर वॉर्ड येथे राहणाऱ्या लल्ली नामक व्यक्तीला वैयक्तिक शत्रुत्वातून मारण्यासाठी अज्ञात व्यक्ती शहरात आले होते. ही बाब लल्ली ह्यांच्या लक्षात येताच तो रात्री 8 ते 8:30 च्या दरम्यान भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे ह्यांच्या घरात शिरला. तेव्हा मागावर असलेल्या मारेकऱ्यांनी त्याच्यावर अंधाधुंद गोळीबार सुरू केला. नेमक्या त्याच वेळी पूर्वशा डोहे अंगणात आल्याने त्यांना छातीत गोळी लागून त्या जागीच कोसळल्या तर लल्लीच्या पाठीला गोळी लागली.#khabarkatta chandrapur

घटना लक्षात येताच घरातील मंडळींनी शेजाऱ्यांच्या मदतीने दोघानाही तत्काळ उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे दाखल केले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पूर्वशा डोहे ह्यांना मृत घोषित केले तर गंभीर जखमी असलेल्या लल्ली ह्याला चंद्रपूर येथे हलविण्यात आले. घटनेच्या वेळी भाजयमो जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे आपले का माजी नगरसेवक राजेंद्र डोहे ह्यांचेसह बाहेर गेले होते.#khabarkatta chandrapur

पूर्वशा डोहेच्या मारेकऱ्यांना राजुरा पोलिसांनी अटक केली आहे आरोपी लबज्योत सिंह दहेल व दुसरा आरोपी अल्पवयीन असून दोन्ही आरोपींवर भादंवी च्या कलम 302, 307, 34 व अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी शस्त्रास्त्र कायद्याच्या कलम 3/25 अन्वये गुन्ह्याची नोंद केली आहे.

Pages