खबरकट्टा/चंद्रपूर:
चंद्रपूर : दुर्धर आजाराने तरुण मुलीला ग्रासले. त्रास असह्य झाल्याने मुलीने आत्महत्या केली. तरुण मुलीने आत्महत्या केल्याचे दुःख पचवत वडिलांनी तिचे नेत्रज्ञान केले. मन हेलावणारी ही घटना शुक्रवारी दुपारी 11 वाजेच्या सुमारास बाबूपेठ परिसरात घडली.#khabarkatta chandrapur
प्रज्ञा कालिदास उंदीरवाडे (22), असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. कालिदास उंदीरवाडे हे आपल्या कुटुंबीयांसह बाबूपेठ येथे वास्तव्यास आहेत. मजुरीचे काम करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. तीन मुलींपैकी सर्वांत लहान असलेल्या प्रज्ञाला मागील काही दिवसांपासून आजार जडला. तिच्यावर उपचारही सुरू होते. मात्र, सततच्या असह्य वेदनांनी ती त्रस्त होती. शुक्रवारी तिला अशाच वेदना झाल्या. दरम्यान, घरीच कुणीच नव्हते. हीच संधी साधून प्रज्ञाने घरीच गळफास घेत आत्महत्या केली. कुटुंबीय घरी येताच हा प्रकार समोर आला.#khabarkatta chandrapur
याबाबतची माहिती रामनगर पोलिस स्टेशनला देण्यात आली. दरम्यान, रामनगर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक स्वप्नील गोपाले, देवीदास राठोड यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. तरुण मुलीने आत्महत्या केल्याने पालकांनी हंबरडा फोडला. मात्र, आपल्या मुलीचे डोळे इतर मुलींच्या आयुष्यात उजेड निर्माण करू शकतात, ही बाब ओळखून त्यांनी आत्महत्येचे दु:ख पचवून मुलीचे नेत्रदान केले. मजूर असलेल्या प्रज्ञाच्या वडिलांचा हा आदर्श सर्वांनाच प्रेरणादायी ठरत आहे.आत्महत्येपूर्वी लिहून ठेवली सुसाइड नोट आत्महत्या करण्यापूर्वी प्रज्ञाने सुसाइड नोट लिहून ठेवली होती. त्यामुळे मी आजाराने त्रस्त झाल्याने आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख केला आहे. घटनेचा पुढील तपास एएसआय रमेश देवगडे व पोलिस शिपाई महेश सोयाम करत आहेत.#khabarkatta chandrapur