खबरकट्टा/चंद्रपूर:
मुल: संपुर्ण महाराष्ट्रा ला हादरवून सोडणाऱ्या समृद्धी महामार्गांवरील विदर्भ ट्रॅव्हर्स चा अपघाताचे प्रकरण ताजे असताना असाच एक अपघात 15 जुलै ला रात्री गडचिरोली चंद्रपुर महामार्गावर मूल नजीक MIDC पाँईट जवळ घडली
रायपूर वरुन हैदराबाद ला 40 ते 45 मजुर प्रवासी घेऊन भरधाव वेगाने जाणारी टायगर कंपनीची स्लिपर कोच क्रमांक ARO1U5655 सिद्धी विनायक ट्रॅव्हल्स भरधाव वेगात असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि रस्त्याच्या कडेला पलटी झाली.
जवळच असलेल्या कंपनीतील कर्मचाऱ्यांना या अपघाताची माहिती मिळताच गाडीतील प्रवाशांना बाहेर काढण्यास त्यांनी धाव घेतली, तसेच मुल पोलिस स्टेशन ला माहिती दिली घटनेचे गांभीर्य लक्षात घेता मुल पोलिस ताबडतोब घटना स्थळावर दाखल झाले जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले वेळीच मदत मिळाल्याने या अपघातात जिवित हानी झाली नाही, मात्र या अपघातात काही प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे.#khabarkatta chandrapur
काही दिवसांपूर्वी चंद्रपूर जिल्हाधिकारी गौडा यांनी ट्रॅव्हल्स धारकांची बैठक घेत प्रवाश्यांच्या सुरक्षेविषयी उपाययोजना करण्याचा सल्ला दिला होता.#khabarkatta chandrapur
यापूर्वी सुद्धा विरुर जवळ मजुरांना घेऊन जाणाऱ्या खाजगी बसचा अपघात झाला होता त्यावेळी एकाचा मृत्यू झाला, त्यांनतर सुद्धा चंद्रपुरातून भरधाव वेगात जाणाऱ्या खाजगी बसची तपासणी सुद्धा केल्या जात नाही.