मणिपूर घटनेवर अॅड. मेघा भाले प्रणित शक्ती मंच च्या महिलांनी बल्लापुरात व्यक्त केला संताप : काँग्रेस,शिवसेना(ऊबाठा) गटाची निदर्शने :माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भेट देऊन केले मार्गदर्शन: #manipur - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



मणिपूर घटनेवर अॅड. मेघा भाले प्रणित शक्ती मंच च्या महिलांनी बल्लापुरात व्यक्त केला संताप : काँग्रेस,शिवसेना(ऊबाठा) गटाची निदर्शने :माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भेट देऊन केले मार्गदर्शन: #manipur

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर : बल्लारपूर :

मणिपूर येथील महिलांवर झालेल्या अत्याचारा विरोधात संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून या घटनेचा निषेध केला जात असून शहरातील शक्ती मंच च्या महिलांसोबत शहर व तालुका महिला काँग्रेस, शिवसेना महिला आघाडी (उद्धव ठाकरे गट) यांनी निदर्शने केले.

मणिपूरमध्ये मागील तीन महिन्यांपासून दंगली भडकत आहेत. मणिपूर शांत करण्यासाठी अजूनही राज्य सरकार आणि केंद्र सरकारला यश आले नाही. दरम्यान मणिपुरातील कुकी समाजातील दोन महिलांची नग्न अवस्थेत दिंड काढून, सामुहिक अत्याचार करण्यात आला. या अत्याचाराची व्हिडीओ क्लिप देशात व्हायरल झाल्यानंतर देशभरात एकच खळबळ उडाली आहे.

मणिपुरातील जातीय संघर्षात आतापर्यंत १४० लोकांनी आपला जीव गमावला आहे. मणिपूरमधील दोन महिलांवरील अत्याचाराची घटना अत्यंत संवेदनशील आणि विचलित करणारी आहे. परंतु देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महिला बालकल्याण मंत्री स्मृती ईराणी यांनी अजूनही मणिपूरबाबत आपल्या तोंडातून एकही शब्द काढलेला नाही.

मणिपुरातील जातीय संघर्षात आतापर्यंत १४० लोकांनी आपला जीव गमावला आहे. मणिपूरमधील दोन महिलांवरील अत्याचाराची घटना अत्यंत संवेदनशील आणि विचलित करणारी आहे. परंतु देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महिला बालकल्याण मंत्री स्मृती ईराणी यांनी अजूनही मणिपूरबाबत आपल्या तोंडातून एकही शब्द काढलेला नाही.

पंतप्रधान सर्व जग फिरत आहेत. परंतु मणिपूरला जाण्यासाठी त्याना वेळ मिळाला नाही. तर मणिपूरचे मुख्यमंत्री यांनी अजूनही कुठलीही ठोस कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे तेथील जनता प्रचंड घाबरलेले आहे. असे असताना दोन महिलांच्या अत्याचाराची बातमी समोर आल्याने संपूर्ण देशभरात संतापाची तीव्र लाट पसरली असून, या घटनेच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात आले.

यावेळी निदर्शने ला माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले. निदर्शने आंदोलनात अॅड. मेघा भाले शहर अध्यक्ष महिला काँग्रेस, अफसना सय्यद तालुका अध्यक्ष महिला काँग्रेस मीनाक्षी गलगट तालुका अध्यक्ष शिवसेना महिला आघाडी, रेखा मेश्राम उपाध्यक्ष शक्ती मंच बल्लारपूर, धम्मदिनी तोहोगावकर सचिव शक्ती मंच बल्लारपूर, सुनंदा आत्राम, शोभा महंतो प्रिया गेडाम, आशा भाले, रेखा मेश्राम, ममता चंदेल, निशा लोखंडे, नालंदा भगत, रुपाली सोनारकर, नेहा मुधडा, बबिता वाजपेयी, अंकुबाई भुक्या, सिमरन खोब्रागडे, आशा खोब्रागडे, मंगला पटेल, कविता डोंगरे, वंदना भगत, गावंडे ताई सह आदी महिला उपस्थित होते.

Pages