खबरकट्टा/चंद्रपूर:
भद्रावती : तालुक्यातील बेलगाव येथे शेतावर काम करणाऱ्या मजुराचा फवारणी पंपाला चार्जिंग लावताना विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी मध्यरात्री घडली; परंतु, हा घातपाताचा प्रकार असल्याने शेतमालकावर गुन्हा दाखल करा, या मागणीसाठी नातेवाईकांसह गावकऱ्यांनी ग्रामीण रुग्णालयाला घेराव घातल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.#khabarkatta chandrapur
स्वप्निल सुहास रासेकर (26, रा. बेलगाव) असे मृत युवकाचे नाव आहे. तर विनोद ठेंगणे राहणार भद्रावती असे शेतमालकाचे नाव आहे. स्वप्निल मागील चार वर्षांपासून ठेंगणे यांच्याकडे शेतमजुरीचे काम करतो. घटनेच्या दिवशी ठेंगणे यांच्या बेलगाव येथील घरी स्वप्निल फवारणी पंपाला चार्जिंग लावत असताना त्याचा खुल्या तारांना स्पर्श झाला. या घटनेत त्याचा मृत्यू झाला.#khabarkatta chandrapur