लग्नासाठी मुलगी देण्यास नकार दिल्याने भाच्याने मामावर केला वार - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



लग्नासाठी मुलगी देण्यास नकार दिल्याने भाच्याने मामावर केला वार

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:

आतेभावाची मामाच्या मुलीशी सोयरिक जोडण्याची प्रथा नवीन नाही. लहानपणापासून बहिणीकडे आपली मुलगी सून म्हणून पाठविण्याचे स्वप्न काही मामा पाहत असतात. पण, या प्रकरणात जे घडले ते जरा वेगळे आहे.#khabarkatta chandrapur

मामाच्या मुलीवर लक्की बढेल हा डोळा ठेवून होता. समुद्रपुर येथील गजानन महाराज देवस्थानात मामा अशोक नकवे व सोबती कमल दुमार राहतात. भाचा लक्की पण सोबतच राहायचा. लक्कीने मामाला त्याच्या मुलीसोबत लग्न करून देण्याची गळ घातली. पण मामाने उत्तरच दिले नाही. त्यामुळे भाचा रागाने धुमसत होता.#khabarkatta chandrapur

रविवारी रात्री हे दोघे गाढ झोपेत असताना लक्की याने दोघांवर धारधार शस्त्राने वार केले. त्यात दोघेही गंभीर जखमी झाल्याने त्यांना प्रथम ग्रामीण रुग्णालयात व नंतर सावांगीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांना या घटनेची माहिती होताच ते घटनास्थळी पोहचले. पण तो पर्यंत आरोपी फरार झाला होता. समुद्रपुरचे ठाणेदार प्रशांत काळे यांनी तपास सुरू केला आहे.#khabarkatta chandrapur


Pages